February 24, 2024
PC News24
वाहतूक

शहराकरिता मेट्रोला संलग्न अशी चक्राकार बस सेवा सुरु.

शहराकरिता मेट्रोला संलग्न अशी चक्राकार बस सेवा सुरु.

पिंपरी :(३ऑगस्ट)-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने मेट्रोला संलग्न असलेली पिंपरी चिंचवड शहराकरिता उपयुक्त अशी चक्राकार बस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अधिक चालना मिळणार आहे.

 

 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा वाहतूक समस्येवरील प्रभावी उपाय असल्याने नागरिकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

या सेवेचा शुभारंभ पिंपरी मेट्रो स्थानकापासून आज महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग आणि महा मेट्रोचे व्यवस्थापन आणि संचालक विनोद कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील सार्वजनिक दळणवळण व्यवस्था एकमेकांशी संलग्न असल्यास नागरिकांना प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे, या हेतूने पीएमपीएमएलने पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी मेट्रो स्टेशन पासून मेट्रोशी संलग्न बस सेवा सुरू केली असुन सार्वजनिक दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएल सतत प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले.

या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त रविकिरण घोडके,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वाहतूक प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, जहिरा मोमीन, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, महा मेट्रोचे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन कक्षाचे उपमहाव्यवस्थापक मनोज कुमार डॅनियल, संचालन कक्षाचे उपमहाव्यवस्थापक निशांत गायकवाड यांच्यासह महा मेट्रो, महापालिका आणि पीएमपीएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महामेट्रोच्या मार्गिका क्रमांक -१ करीता पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत पीएमपीएमएल मार्फत फिडर बस सेवा आजपासुन सुरु करण्यात आली. यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नुकताच पिंपरी ते पुणे सिविल कोर्ट असा महा मेट्रोचा मार्ग सुरू झाला आहे. कमीत कमी वेळेत सुखकर आणि सुरक्षित प्रवास या माध्यमातून नागरिकांना करता येणार आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी पीएमपीएमएलची संलग्न बस सेवा उपयुक्त ठरणार आहे. रिक्षा सायकल आणि पायी चालणे अशा संलग्न वाहतुक पद्धतीचा वापर करून भविष्यात उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येवर सक्षमपणे पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक समस्या अधिक नसली तरी सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेचा नागरिकांनी वापर केल्यास खाजगी वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी होईल. पर्यायाने भविष्यातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल. पर्यावरणासाठी देखील ते उपयुक्त ठरणार आहे.

विनोद कुमार अग्रवाल म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमपीएम एल यांनी पुढाकार घेऊन मेट्रोला संलग्न असलेली बस सेवा सुरू केली. सार्वजनिक दळणवळणाचा अधिक वापर होण्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असून या सेवेच्या वापरामुळे प्रवाशांचा वेळ तसेच पैशांचीही बचत होणार आहे.

फिडर बससेवेचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग हे मेट्रोने प्रवास करत पीसीएमसी मेट्रो स्थानकावर पोहोचले. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सचिंद्र प्रताप सिंग,शेखर सिंह आणि विनोद कुमार अग्रवाल यांनी पिंपरी ते घरकुल चिखली या दरम्यान धावणाऱ्या चक्राकार पीएमपीच्या बसला हिरवा झेंडा दाखवून फिडर बस सेवेचा शुभारंभ केला आणि बसमधून प्रवास केला. त्यांच्या समवेत उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांनी रितसर तिकीट काढून प्रवास केला.

पीएमपीएमएलने पिंपरी ते घरकुल चिखली तसेच पिंपरी ते काळेवाडी फाटा अशा दोन मार्गावर चक्राकार बस सेवा सुरु केली आहे. मेट्रोशी संलग्न असलेली ही सेवा नागरिकांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Related posts

पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त जादा बसेसचे विशेष नियोजन.

pcnews24

मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद.

pcnews24

पुणे:झुरळांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर ड्रामा; प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली

pcnews24

बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ… आरोपीला अटक.

pcnews24

कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; पुणे मुंबई द्रुतगती मार्ग

pcnews24

महाराष्ट्र:कोकणवासियांच्या गणेशोत्सव आनंदासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यात वाढ

pcnews24

Leave a Comment