February 24, 2024
PC News24
गुन्हा

रावण टोळीतील गुंडाला गुजरातमध्ये पकडला -चिखली पोलिसांची कारवाई.

रावण टोळीतील गुंडाला गुजरातमध्ये पकडला -चिखली पोलिसांची कारवाई.

पोलिसांना अनेक महिन्यांपासून चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोक्कातील आरोपीला चिखली पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे अटक केली.रावण टोळीचा सदस्य कपिल उर्फ विजय दिपक लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.चिखली येथे 22 मे रोजी सोन्या तापकीर या तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. याप्रकरणातील प्रमुख आरोपीसह इतरांना पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली.पोलिसांनी या टोळीला मोकाही लावला.मे महिन्यापासून लोखंडे पोलिसांना चकवा देत होता. तेव्हापासून चिखली पोलीस त्याच्या मागावर होते.

पोलिसांच्या तांत्रीक विश्‍लेषणात 28 जुलैला कपिल लोखंडे याने इंस्टाग्राम वरुन चिखली परिसरात राहणाऱ्या मैत्रीणीला संपर्क केल्याचे आढलले. चिखली पोलिसांनी तात्काळ त्याच्या मैत्रिणीस ताब्यात घेवून तिच्या माध्यमातून लोखंडे याच्याशी संपर्क सुरू ठेवला.

पोलीस उपनिरीक्षक बारावकर यांच्या पथकाने वडोदरा, गुजरात येथील स्थानिक मकरपुरा पोलिसांची मदत घेवुन लोखंडे याला ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्‍त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, भानुदास बर्गे, सहायक निरीक्षक तोफिक सय्यद, उपनिरीक्षक पुजारी, कुमटकर, बारवकर, कर्मचारी वडेकर, नागरे, तारळकर, साकोरे, जाधव, पिंजारी, केदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related posts

संपूर्ण कुटुंबाला पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना

pcnews24

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी.

pcnews24

साधूंच्या हत्येप्रकरणी CBI चौकशी होणार‌.

pcnews24

फुकट्यांकडून रेल्वेने केला 1 कोटी 42 लाखांचा दंड वसूल.

pcnews24

कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसमध्ये केली चोरी.

pcnews24

गुंडा विरोधी पथकातील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण

pcnews24

Leave a Comment