February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुणे:15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डान्स टीचर ला अटक.

पुणे:15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डान्स टीचर ला अटक.

पुण्यातील हडपसर भागात राहणार्‍या 15 वर्षीय मुलीवर डान्स टीचरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तू दिसायला सुंदर आहे,तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे सांगून आमिष दाखवले व फसवणूक करीत लैंगिक अत्याचार केले.

सुशील राजेंद्र कदम वय 32, रा. सर्व्हे नंबर 103 गोपालपट्टी चौक मांजरी बुद्रुक असे आरोपीचे नाव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यापासून आरोपी सुशील कदम यांच्याकडे पीडित मुलगी डान्स शिकण्यास जात होती.

तू दिसायला सुंदर असून तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे आरोपी सुशील कदम याने पीडित मुलीस सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून पालकांनी परवानगी दिली व तो तरुणीला अनेक वेळा फस्ट लुक करिता घेऊन गेला.प्रत्येक वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तू जर कोणाला काही सांगितले. तर तुझ्या आई वडीलांना जीवे ठार मारेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला नाही.

फस्ट लुक करीता काल देखील पीडित मुलीला आरोपी सुशील कदम घेऊन गेला. पण पीडित मुलीच्या आईला संशय आल्याने आरोपी सुशील कदम यास फोन केला. तुम्ही कुठे आहात आता भेटायच आहे.त्यावर आरोपी सुशील कदम याने उडवाउडवीची उत्तर दिली.आम्ही सासवड येथील लॉजवर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीचे घरचे सर्वजण घटनास्थळी गेले. त्यावेळी पीडित मुलीने तिच्यावर होणार्‍या अत्याचाराबाबत सांगितले. या घटनेनंतर आरोपी सुशील कदम विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Related posts

थेरगाव:‘भेटायला ये नाहीतर …? एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला धमकी.

pcnews24

चिखलीत गोळी घालून मित्राची हत्या

pcnews24

मेहूल चोक्सीची बँक खाती जप्त करण्याचे आदेश

pcnews24

आरबीआयचा PayTm पेमेंट्स बँकेला दणका,ठोठावला दंड

pcnews24

‘लोकसेवकानेच घेतली लाच’ सापळा रचून केली अटक.

pcnews24

अशी करा सायबर फसवणुकीची तक्रार अशी करा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार….

pcnews24

Leave a Comment