February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे मेट्रोची स्टिअरिंग सावित्रीच्या लेकींच्या हाती;…नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी.

पुणे मेट्रोची स्टिअरिंग सावित्रीच्या लेकींच्या हाती;…नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी.

पुणे मेट्रोची स्टेरिंग नारी शक्तीच्या हाती देण्यात आली आहे. तब्बल नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी लागली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे पुणे मेट्रोची जोरदार चर्चा होत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याला स्त्री शिक्षण चळवळीचा मोठा इतिहास आहे त्यामध्ये सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे आणि लक्ष्मीबाई टिळक यांचा महत्वाचा वाटा आहे. ज्या पुण्यात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यात आता त्यांच्या लेकी पुढचं पाऊल टाकत आहेत. पेठांचे पुणे आता मेट्रो शहर झाले आहे. पुण्याच्या गतिमानतेला आता अधिक गती मिळाली आहे. यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पुण्याला गतिमान करणाऱ्या मेट्रोची स्टेरिंग महिलांच्या हाती आली आहे.

 

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला लोको पायलट आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेऊन या मुली इथपर्यंत आलेल्या आहेत.

साताऱ्याहून आलेली अपूर्वा प्रमोद आलटकर महिला पायलट असून यापूर्वी त्यांनी भारत फोर्जमध्ये नोकरी केलेली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ त्यांची निवड पुणे मेट्रोचा पायलट म्हणून झाली. दहावीपर्यंत शिक्षण सातारा झाल्यानंतर मेकॅनिकल डिप्लोमा सोलापूरमध्ये केला. त्यानंतर इंजीनियरिंगची पदवीही घेतली. त्यानंतर मेट्रोमध्ये रुजू झाल्या. मेट्रो चालवतानाचा एक वेगळा अनुभव आहे.आपलं सर्वत्र कौतुक होतं याचाही खूप मोठा अभिमान आहे. आई-वडिलांना सुद्धा खूप आनंद होत आहे. ज्यांना मी ओळखत नाही त्या लोकांनी सुद्धा माझा स्टेटस ठेवून माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे खूप छान वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया ही खूप छान आहेत. एक महिला म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया अपूर्वा अलाटकर यांनी दिली आहे.

पुण्यातील चाकण भागात राहत असलेली शर्मीन अय्याज शेख या देखील पुणे मेट्रोच्या लोको पायलट आहेत. कुठलीही गाडी चालवता येत नसलेली मी आज मेट्रो चालवत आहे याचा मला खूप अभिमान आहे. सुरुवातीला खूप भीती वाटली. परंतु ज्या वेळेस मी एवढे प्रवासी घेऊन मेट्रो चालवत आहे. हे पाहिलं त्यावेळेस वाटलं, आपण धाडस केलं आणि आपण यशस्वी झालो. खूप अभिमान स्वतःवरच वाटत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related posts

एसटीपी च्या कामाला वेग, उद्योगंत्री उदय सामंत यांच्याबरोबर जिल्ह्यातील संबंधित अधिका-यांची बैठक

pcnews24

Pune, PCMC : मेट्रोच्या १८ स्थानकांपासून शेअर रिक्षाचे मार्ग आणि दर निश्चित.

pcnews24

पुणे मेट्रो दुसऱ्या टप्प्यात ३० हजार नागरिकांचा प्रवास.

pcnews24

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी.

pcnews24

मेट्रोच्या तिकीट दरात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

pcnews24

प्रवासी अन् कंडक्टरच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल!!

pcnews24

Leave a Comment