February 24, 2024
PC News24
गुन्हा

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीची रायगड पोलिसात तक्रार.

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीची रायगड पोलिसात तक्रार.

नितीन देसाई यांच्या आत्महत्याप्रकरणी मोठा ट्विस्ट आला आहे. देसाई यांच्या पत्नीने या प्रकरणी पोलिसात फायनान्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नितीन देसाई यांना फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशासाठी तगादा लावल्यानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता या तक्रारीची दखल घेऊन खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन. डी. फिल्म स्टुडीओचे मालक आणि निर्माते दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८ वर्षे) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे मृत्यू बाबत खालापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती परंतु आता त्यांच्या पत्नीने तक्रार दिल्यामुळे ट्विस्ट आला आहे.नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी लेखी तक्रार दिली आहे. ‘ECL फायनांन्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे’, असे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात २६९/२०२३ भादवि ३०६, ३४ अन्वये वरील ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी आणि इतर अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग हे करीत आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडून देण्यात आली आहे.

Related posts

अशी करा सायबर फसवणुकीची तक्रार अशी करा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार….

pcnews24

पिंपरी चिंचवड:संघटित गुन्हेगारी करणाऱ्या करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे.

pcnews24

देश:ओळख लपवून लग्न करणाऱ्यांनो,आता तुमची खैर नाही, सरकार झाले सतर्क.

pcnews24

दरोड्यातील कुख्यात आरोपींना काही तासातच मुद्देमाल व शस्त्रासह अटक.लातूर पोलिसांची कामगिरी.

pcnews24

पुण्यात आणखी दोन दहशतवाद्यांनाअटक; एक भूलतज्ज्ञ डॉक्टर आयसीसशी संबंधित.

pcnews24

वाकड येथील सोसायटीच्या आवारातील वाहने जाळली

pcnews24

Leave a Comment