February 24, 2024
PC News24
अपघात

केदारनाथ : गौरीकुंड येथे दरड कोसळली;19 जण बेपत्ता

केदारनाथ : गौरीकुंड येथे दरड कोसळली;19 जण बेपत्ता

केदारनाथ यात्रा मार्गावर गुरुवारी (दि. 3) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास डाट पुलाजवळ गौरीकुंड येथे दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत डोंगराच्या पायथ्याशी असलेली तीन दुकाने वाहून गेली असून तीन दुकाने दरडीखाली गाढली गेली आहेत. यामध्ये 19 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये स्थानिकांसह नेपाळ येथील नागरिकांचा समावेश आहे.

बेपत्ता असलेल्या 19 जणांपैकी 12 जणांची ओळख पटली असून त्यातील तीन मृतदेह काढण्यात आले आहेत.घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मंदाकिनी नदीला पूर आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

या घटनेमुळे केदारनाथ यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्या पैकी काहीजण पाण्यात वाहून गेल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.गौरीकुंड येथे वीर बहादूर आणि सुमित्रा वीरबहादूर (रा. नेपाळ) हे दाम्पत्य ढाबा चालवत होते. त्यांच्या ढाब्यावर दरड कोसळली असल्याने त्यात हे दांपत्य देखील बेपत्ता झाले आहे. त्यांच्यासोबत ढाब्यावर जेवणासाठी आलेले यात्रेकरू देखील बेपत्ता आहेत. गौरीकुंड परिसरात ठराविक अंतराने दरडी कोसळत आहेत.

Related posts

नामांकित बिझनेस महाविद्यालयातील 40विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास-,पालकवर्ग चिंतेत.

pcnews24

लोणावळा : गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा;कायदा, नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू : सत्यसाई कार्तिक.

pcnews24

ओडिशा :’शवागारात सापडला जिवंत मुलगा’- वडिलांच्या अथक प्रयत्नांना मिळालं यश,ओडिसा रेल्वे अपघातचा हृदयद्रावक थरार.

pcnews24

पुण्यात शिवशाही बसचा अपघात

pcnews24

महाराष्ट्र:मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना मिळणार इतके विमा संरक्षण.

pcnews24

समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, बस जळाल्याने 25 प्रवाशांचा मृत्यू तर 8 जखमी.

pcnews24

Leave a Comment