February 24, 2024
PC News24
खेळ

सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे ६ सामने संपन्न-शहरातील विविध शाळांचा सहभाग.

सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे ६ सामने संपन्न-शहरातील विविध शाळांचा सहभाग.

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा क्रिडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगणात सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचा आज चौथा दिवस पार पडला.
या स्पर्धेचे एकूण ६ सामने संपन्न झाले असून शहरातील विविध शाळांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये पहिला सामना एस. एन. बी. पी. स्कूल, १७०३ आणि अभिषेक विद्यालय, चिंचवड यांच्यामध्ये झाला. या सामन्यामध्ये एस. एन. बी. पी. स्कूलच्या पृथ्वीराज बहुरे आणि तरबेज खान या खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात अभिषेक विद्यालय संघाला एकही गोल करता आला नाही.
दुसरा सामना कमलनयन बजाज स्कूल विरूद्ध सिटी प्राईड स्कूल, मोशी यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात अक्षत चौगुले या कमलनयन बजाज स्कूलच्या खेळाडूने १ गोल मारून आपल्या संघास विजयी केले.
तिसरा सामना सीटी प्राईड स्कूल, निगडी विरूद्ध दि न्यू मिलेनियम स्कूल, नवी सांगवी यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात सिटी प्राईड स्कूलने विजय मिळवला. सिटी प्राईड स्कूलच्या अर्जूनसिंग गील तसेच आयुष टोके या खेळाडूंनी अनुक्रमे २ व १ गोल केले.
चौथा सामना जी. जी. इंटरनॅशनल स्कुल, पिंपरी विरूद्ध सेंट ज्युड हायस्कूड, देहुरोड यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात श्लोक पुजारी या जी. जी. इंटरनॅशनल स्कुलच्या खेळाडूने १ गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
पाचवा सामना विद्यानिकेतन टाटा मोटर्स स्कूल विरूद्ध माऊंट लिटेरा स्कुल, वाकड यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात विद्यानिकेतन टाटा मोटर्स स्कूलने विजय मिळवला. या संघातील अर्णव सकुंडे या खेळाडूने १ गोल तर आर्यन कंद या खेळाडूने १ गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
सहावा सामना एल्प्रो स्कुल, चिंचवड विरूद्ध इन्फंट जिजस स्कूल यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी केली होती. त्यानंतर पेनल्टी शुटमध्ये एल्प्रो स्कूलने २-१ अशी विजयी बाजी मारली. या सामन्यात एल्प्रो स्कुलच्या अर्जुन सुर्वे या खेळाडूने १ मैदानी गोल तर इन्फंट जिजस स्कूलच्या यशराजने एक मैदानी गोल केला होता. पण सामना बरोबरीचा झाल्याने पेनल्टी शुटच्या साहाय्याने या सामन्याला निकाल लावण्यात आला. पेनल्टी शुटमध्ये एल्प्रो स्कुल संघाने २-१ असा विजय मिळविला. पेनल्टी शुटमध्ये गर्व बजाज आणि कार्तिक पांडेने गोल मारला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर इन्फंट जिजस स्कूलच्या यशराजने पेनल्टी शुटमध्येही गोल केला पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.

Related posts

आंतरराष्ट्रीय क्रीडा: 15 जुलै: भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची शक्यता नाही.

pcnews24

सातारा स्पोर्टस् ऐप माध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात राहण्याचा वेगळा प्रयत्न.

pcnews24

शरद पवार यांच्या वक्तव्याने आघाडीत संभ्रम.

pcnews24

चीनचा पुन्हा खोडसाळपणा, व्हिसा नाकारला

pcnews24

आशियाई गेम्समध्ये भारताला पहिले गोल्ड!!!

pcnews24

कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी

pcnews24

Leave a Comment