February 24, 2024
PC News24
सामाजिक

महापालिकेच्या वृक्षारोपण पंधरवडा उपक्रमास सुरुवात.

महापालिकेच्या वृक्षारोपण पंधरवडा उपक्रमास सुरुवात.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने दि. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला वृक्षारोपण पंधरवडा असे संबोधण्यात आले असून शहरात ७५ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा काल चौथा दिवस पार पडला. या वृक्षारोपण उपक्रमांमध्ये उद्यान विभाग प्रमुख रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण मोहीमेत सक्रीय सहभाग घेतला.

आज इसी ३४ जे ब्लॉक भोसरी व मराठा चेंबर्स रोड एमआयडीसी रोड, भोसरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहाय्यक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, उद्यान सहाय्यक सुहास सामसे, मॅनेजिंग डायरेक्टर धनंजय दबके तसेच देवेंद्र जोशी, संतोष वळसे पाटील, सोमनाथ कुदळे, भानुदास तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने याव्यतिरिक्त साधू वासवानी रोड, शास्त्रीनगर या ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास अधिकारी, विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

मणिपूर:दंगलग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी राहुल छावण्यांना गांधींची भेट

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरीक व प्रशासनात चर्चा.नागरीकांनच्या सुचनांनवर अंमलबजावणी होणार.

pcnews24

रावेत:नागरी समस्याबाबत रावेत पोलीस ठाणे येथे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृतीसमितीद्वारे बैठक.

pcnews24

पिंपरी चिंचवडमध्ये 125 इमारती धोकादायक

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन.

pcnews24

पुणे:वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात लवकरच तीन नवे उड्डाणपूल.

pcnews24

Leave a Comment