February 24, 2024
PC News24
तंत्रज्ञान

पिंपरी चिंचवड:औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर एजर्नी प्रकल्प प्रस्ताव-आमदार महेश लांडगे.

पिंपरी चिंचवड:औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर एजर्नी प्रकल्प प्रस्ताव-आमदार महेश लांडगे.

पिंपरी- चिंचवड औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याबाबत आवश्‍यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली.यामधे

एमआयडीसी,महावितरण,आणि सोलर एजर्नी प्रकल्प,यांनी एकत्रितपणे औद्योगिक पट्टयात प्रकल्प धोरण ठरवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी उद्योजक आणि अधिकारी यांना केले.

हिवाळी अधिवेशनात ‘सोलर प्रोजेक्‍ट’करीता लागणाऱ्या अनुदाना संदर्भात पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे. औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर प्लँट’साठी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे.सोलर प्रोजेक्‍ट उभारणी आणि त्याला येणाऱ्या अडचणीवर काय यावर विचार विनिमय करण्यात आला.

यावेळी पिंपरी- चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सुरेश म्हेत्रे, सचिव जयंत कड, नवनाथ वायाळ, संजय सातव, सचिन पाटील, योगेश लोंढे, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता संजीव राठोड, भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतूल देवकर, आकुर्डी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव, उप कार्यकारी अभियंता सागरे, सहाय्यक अभियंता दिवटे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उद्योजकांनी समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. यामध्ये फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे.

फिडर पीलरमधील खराब पर्ट्स बदलणे. खराब दरवाजे बदलणे. केबल नादुरुस्त वाहन वेळेवर उपलब्ध करून देणे. फिडरची लांबी कमी करणे व त्यासाठी लागणारे इंव केबल्स उपलब्ध करून देणे. फिडरवरील विजेचा ताण कमी होऊन तक्रारी कमी होतील.

ओव्हर लोड ट्रान्सर्फामरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्‍यक तेवढीच ठेवणे व आवश्‍यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसविणे याविषयी चर्चा झाली.

Related posts

अॅपलची नवीन १७.२ ऑपरेटिंग सिस्टीम लाँच,काय आहे नविन ?

pcnews24

तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून रविवारी ई कचरा संकलन मोहीम.

pcnews24

‘देशात लवकरच 6 जी युग अवतरणार’ -पं.नरेंद्र मोदी

pcnews24

इस्रोवर दररोज १००पेक्षा अधिक सायबर हल्ले,अध्यक्ष एस. सोमनाथ यांची धक्कादायक माहिती.

pcnews24

चांद्रयान-3 च्या लँडिंगची वेळ पाहा..

pcnews24

काल पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित, समजून घ्या कारणे…

pcnews24

Leave a Comment