February 24, 2024
PC News24
खेळ

महापालिकेच्या शाळेत रायफल शूटिंग प्रशिक्षण उपक्रम.

महापालिकेच्या शाळेत रायफल शूटिंग प्रशिक्षण उपक्रम.

पिंपरी – सध्या पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढला असला तरी महापालिका शाळा मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उत्तम उत्तम उपक्रम घेत आहेत यापैकीच महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयानेही असाच एक वेगळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकृष्ट केले आहे. या शाळेत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून, त्यात २५ ते ३० मुले प्रशिक्षण घेत आहेत. थेरगाव येथील माध्यमिक शाळेत रायफल शूटिंगचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. याचे विशेष म्हणजे माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी मोडकळीस आलेले टेबल आणि इतर टाकाऊ साहित्य वापरून हे केंद्र तयार केले आहे.

गेल्यावर्षी, १६ ऑगस्ट २०२२ रोजी उद्घाटन केले. रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र उभारणारी थेरगाव येथील ही पहिलीच महापालिकेची शाळा आहे. रायफल शूटिंगची रेंज दहा मीटर इतकी आहे. नुकतीच जिल्हास्तरीय रायफल शूटिंगची स्पर्धा या शाळेत झाली. मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड म्हणाले,‘‘आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकावा, अशीच इच्छा प्रत्येक पालकांची असते. योग्य प्रशिक्षण आणि अत्याधुनिक रायफल मिळाल्यास महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर वरून नावलौकीक मिळवतील.येथील गरीब आणि होतकरू मुलांना मोफत प्रशिक्षण मिळेल, यासाठी नियोजन सुरू आहे.’’ गरीब आणि होतकरू मुलांसाठी रायफल शूटिंगची आवड जोपासणे अशक्यच असते. महिन्याला खासगी ठिकाणी रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास प्रतिमहिना ५ ते १० हजार मोजावे लागतात.

हे लक्षात घेऊन माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी शाळेतच पार्किंगच्या ठिकाणी प्रशस्त असे रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. रायफल शूटिंग रेंजवर फक्त ३ रायफल आणि दोन डमी पिस्तूल आहेत. प्रशिक्षणात चाळीस टक्के मुली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक विजय रणझुंजारे स्वखर्चाने ५०० पॅलेट्सचा बॉक्स आणतात. सरासरी दररोज सातवी ते दहावीचे असे ३० विद्यार्थी नेमबाजीचा सराव करत आहे

Related posts

भारत फायनल जिंकला… ट्रॉफीही जिंकली

pcnews24

‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’

pcnews24

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेवर मात करून भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल

pcnews24

चीनचा पुन्हा खोडसाळपणा, व्हिसा नाकारला

pcnews24

शतकवीर राचिनच्या नावात द्रविड अन् तेंडुलकर !

pcnews24

‘आरोप सिद्ध झाले तर फाशी घेईन’ ब्रिजभूषण सिंग.

pcnews24

Leave a Comment