February 24, 2024
PC News24
ठळक बातम्या

पुणे:ATS:देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला.

पुणे:ATS:देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला.

पुणे शहरात पकडलेल्या दहशतवाद्यांचा देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडवण्याच कट होता,अशी धक्क्कादायक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. ‘इस्लामिक स्टेट (आयएस) आणि अलसुफा या दहशतवादी संघटनांशी संबंधित या दहशतवाद्यांनी जगभरातील दहशतवादी हल्ल्यांची माहिती घेऊन देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याची तयारी केली होती,’ असे ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४), महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा), अब्दुल कादिर दस्तगीर पठाण (वय ३२, कोंढवा) आणि सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७ रा. रत्नागिरी) या चारही आरोपींच्या पोलिस कोठडीत ११ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शनिवारी दिला. साकी आणि खान यांना पठाण याने कोंढव्यात खोली उपलब्ध करून दिली होती, तर सिमाब याने आर्थिक मदत केली होती.कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नातील साकी आणि खान यांच्याकडून पांढऱ्या रंगाची पावडर, काडतूस, दहशतवादी संघटनांची पत्रके तसेच ड्रोनचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. चौकशीदरम्यान त्यांनी ही ठिकाणे एटीएसला दाखवली आहेत, असे सरकारी वकील विजय फरगडे यांनी सांगितले. आरोपींच्या वतीने ॲड. यशपाल पुरोहित यांनी युक्तिवाद केला.

दहशतवाद्यांकडून देशातील काही ठिकाणांचे नकाशे जप्त करण्यात आले आहेत. त्यावरून देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडवण्याच कट होता हे सिद्ध होते. त्यातील एक नकाशा ‘एटीएस’ने न्यायालयात सादर केला. निर्बंध असलेले काही रसायने आणि स्फोटक पदार्थांची दहशतवाद्यांनी खरेदी केली होती. या वस्तू खरेदी करताना ओळखपत्र देणे बंधनकारक असते. बनावट आधारकार्ड दाखवून या वस्तू खरेदी करण्यात आल्या. या वस्तूंचा वापर बॉम्बसाठी करण्यात आल्याचा अंदाज आहे.

“राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्र्र मोड्यूल प्रकरणी अटक केलेले आरोपी आणि पुण्यात अटक केलेले आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रात्यक्षिक एकत्रित घेतले होते. हे आरोपी त्यांच्या शिक्षणापेक्षा अद्ययावत साधनांचा वापर करण्यात सराईत आहेत. त्यांच्यामागे मोठी यंत्रणा असल्याची शक्यता आहे.”- अरुण वायकर, सहायक पोलिस आयुक्त (एटीएस)

Related posts

संभाजी नगर चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय सहा वर्षांपासून बंद, नूतनीकरणावर मोठा खर्च.

pcnews24

क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकिंना घेतले ताब्यात ,चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीच्या बंद फ्लॅटमध्ये होता सट्टा सुरू.

pcnews24

CBSE – बारावीचा निकाल जाहीर

pcnews24

पोलीस होणाऱ्या साईनाथची नक्षलींकडून निर्घृण हत्या,युवकांच्या प्रगतीला नक्षलींकडून विरोध.

pcnews24

एप्रिलमध्ये एकूण किती कोटी जीएसटीचे संकलन ?

pcnews24

पुणे:सदाशिव पेठेत झालेल्या गंभीर हल्ल्या प्रसंगी गैरहजर असलेल्या तीन पोलिसांचे निलंबन

pcnews24

Leave a Comment