March 1, 2024
PC News24
धर्म

देश;अयोध्या-रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली.

देश;अयोध्या-रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला शुभ मुहूर्त ठरला आहे. पुढील वर्षी जानेवारीतील तीन दिवस ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत साधू-संत प्रतिष्ठापनेसाठी उपस्थित राहणार आहेत.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुढील वर्षी २१ ते २३ जानेवारी या तारखा प्रस्तावित केल्या आहेत. या कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले, ‘पुढील वर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राम जन्मभूमीमध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पार पडेल. त्यासाठी २१ ते २३ जानेवारी काळात पार पडेल. या सोहळ्याला पंतप्रधानांबरोबरच देशभरातील प्रमुख साधू आणि प्रतिष्ठितांना निमंत्रण देण्यात येणार आहे. देशभरातील १३६ सनातन परंपरांच्या २५ हजारांवर प्रमुखांना निमंत्रित करण्याचे नियोजन ट्रस्टने केले आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने संतांची यादी तयार करण्यात येत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या स्वाक्षरीचे निमंत्रण सर्वांना पाठविण्यात येईल,’ असेही राय यांनी सांगितले.

‘मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्याच्या सोहळ्यानिमित्त महिनाभर अन्नदान करण्याची योजना ट्रस्टने आखली आहे. संपूर्ण जानेवारी महिनाभर रोज सुमारे ७५ हजार ते एक लाख लोकांना अन्नदान केले जाईल,’ अशीही माहिती राय यांनी दिली.

Related posts

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; तर मुंबईत इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची स्टोरी

pcnews24

श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांच्याकडून मोफत ‘फराळ सेवा’.

pcnews24

लव जिहादच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा

pcnews24

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहाद?..गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

pcnews24

सरकारचा जीआर जरांगे पाटील यांना अमान्य- आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

pcnews24

Leave a Comment