February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे:झुरळांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर ड्रामा; प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली

पुणे:झुरळांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर ड्रामा; प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली.

मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली ‘पनवेल-नांदेड एक्स्प्रेस’ प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी दि.५ ऑगस्टला सायंकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन तब्बल एक तास पुणे स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना मोठा उशीर झाला असून, प्रवाशांना झुरळांचा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या सातत्याने अनेक तक्रारी येत असतात त्यातली ही तक्रार आहे.

प्रवाशांनी रेल्वे रोखून ठेवल्यानंतर रेल्वे प्रशासनानं झुराळाबाबत तातडीने उपयोजना करण्याची मागणी केली. अन्यथा गाडी पुढे जाऊन देणार नाही असा थेट इशारा प्रवाशांनी अधिकाऱ्यांना दिला. या मुळे रेल्वे तब्बल एक तास पुणे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबली होती. या दरम्यान संतापलेल्या प्रवाशांनी झुरळांचे व्हिडिओ चित्रीकरण करत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केले.

रेल्वे प्रशासनाला याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाने या डब्यामध्ये जाऊन प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवासी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रवाशांनी रेल्वेकडे याबाबत लेखी आश्वासन मागितले त्यानंतरच गाडी नांदेडच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने या डब्यामध्ये एक स्वच्छता कर्मचारी, एक इंजिनियर पाठवून दिले आणि नांदेड स्थानकावर हा डब्बा रिप्लेस करण्यासंदर्भात किंवा पेस्ट कंट्रोल करण्या संदर्भात कर्मचाऱ्यांना सांगितले.

Related posts

ओडिशात 3 गाड्या रुळावरून घसरल्याने 50 पेक्षा जादा ठार, 350 पेक्षा जास्त जखमी

pcnews24

महाराष्ट्र: सोलापूर ते मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

pcnews24

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग.

pcnews24

देश : ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा पंतप्रधानाच्या हस्ते शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार.

pcnews24

धावत्या शिवशाही बसचे चाक निखळले.

pcnews24

निगडी बस स्टॉप ते इन्स्प्रिया मॉल ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतूक कोंडी,रस्त्यावर झोपून आंदोलनाचा इशारा.सचिन काळभोर

pcnews24

Leave a Comment