February 24, 2024
PC News24
देश

देश:लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराचे वय कमी करण्याची शिफारस;निवडणूक आयोगाची मान्यता?

देश:लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराचे वय कमी करण्याची शिफारस;निवडणूक आयोगाची मान्यता?

लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराचे पात्रता वय सध्याच्या २५ वर्षांवरून १८ वर्षे करण्याची सूचना राज्यसभेच्या संसदीय स्थायी समितीने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच फेटाळला असून,परंतु आता पुन्हा एकदा संसदीय समितीने ती शिफारस केली आहे. यासाठी फिनलंड मॉडेलचा संदर्भ समितीने दिला आहे.

सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष, भाजप खासदार सुशीलकुमार मोदी यांनी निवडणूक प्रक्रिया आणि त्यांच्या सुधारणेच्या पैलूंवरील १३२वा अहवाल सादर केला. नवतरुणांनी अधिकाधिक प्रमाणात राजकीय सहभाग घ्यावा यासाठीचे आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये सुसज्ज करण्यासाठी सर्वसमावेशक नागरी शिक्षण कार्यक्रम राबविण्यास निवडणूक आयोग आणि सरकारने प्राधान्य द्यावे, अशीही शिफारस मोदी समितीने केली आहे. ‘फिनलंडने लागू केलेले नागरिकत्व प्रशिक्षणाचे यशस्वी मॉडेल स्वीकारल्यास ते याबाबतीत उपयुक्त ठरेल,’ असाही सल्ला या समितीने दिला आहे. निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट शिथिल केली; तर तरुणांना लोकशाही प्रक्रियेत व निवडणुकीत उमेदवारीसाठी समान संधी मिळेल, असे समितीचे मत आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांसारख्या विविध देशांच्या पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय निवडणुकांमध्ये उमेदवारीसाठी किमान वय १८ वर्षे असावे, असे समितीचे मत आहे. निवडणूक आयोगाचे मत मात्र वेगळे आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी सांभाळण्यासाठी १८ वर्षांच्या मुलाकडे आवश्यक अनुभव आणि परिपक्वता असण्याची अपेक्षा करणे अवास्तव आहे, असे निरीक्षण नोंदवताना आयोगाने सध्याची वयोमर्यादा कायम ठेवली होती परंतु आता पुन्हा एकदा संसदीय समितीने ती शिफारस केली आहे.

Related posts

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग.

pcnews24

‘नारी शक्ती वंदन!- ‘महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मान्यता.

pcnews24

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात तब्बल 2 तास चर्चा.

pcnews24

दोन अपयशानंतर तिसऱ्यांदा मिळालेले यश देशात UPSC परीक्षेत प्रथम-ईशिता किशोरने.

pcnews24

स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका 1 लाख रुपये

pcnews24

देश:विजेचे बिल सुमारे 20 टक्क्यांनी घटणार

pcnews24

Leave a Comment