February 24, 2024
PC News24
राजकारण

दादा! आप बहोत दिनो बाद सही जगह पे बैठे हो!,केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याने टाळ्यांचा कडकडाट

दादा! आप बहोत दिनो बाद सही जगह पे बैठे हो!,

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याने टाळ्यांचा कडकडाट

सहकार मंत्रालयाच्या केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या या वाक्याने पिंपरी चिंचवड रामकृष्ण मोरे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि एकच हशा पिकला.

अजित दादा उपमुख्यमंत्री झाल्या नंतर पहिल्यांदाच आपण एका मंचावर आल्याचे सांगत अमित शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलून सभागृहातील वातावरण हलके केले.

अमित शहा म्हणाले, “अजित दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या सोबत मी प्रथमच कार्यक्रम करीत आहे. तर मी दादांना एक गोष्ट सांगू इच्छितो. दादा, तुम्ही खूप कालावधी नंतर योग्य ठिकाणी बसला आहात. हीच जागा योग्य होती. पण आपण खूप उशीर लावलात.”

अमित शहा यांच्या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि हशा पिकला. शहा यांनी महाराष्ट्र हे देशाच्या सहकाराची राजधानी असल्याचा उल्लेख केला.

राज्यात ज्यांनी सहकाराला सुरुवात केली, त्यांचाही उल्लेख करत शहा यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणा वर भाष्य केले. तरी शहा यांच्या अजित पवार यांच्या विषयीच्या वक्तव्याची भाषणानंतर देखील चर्चा रंगली.

Related posts

आणि खळबळ जनक वक्तव्य पंचम कलानी यांच्याकडून शरद पवारांन बाबतीत

pcnews24

पिंपरी,चिंचवड,भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात घेणार मोठी झेप – बाळासाहेब थोरात

pcnews24

निलेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य, औरंगाजेबचा पूनर्जन्म….

pcnews24

महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी!!

pcnews24

आमदार महेश लांडगे यांची महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ ‘आखाड पार्टी’

pcnews24

मराठा समाजाने टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या परिवाराचा विचार करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन.

pcnews24

Leave a Comment