February 24, 2024
PC News24
गुन्हा

देश : कोलकाता : ‘सरोगेट मदर’ च्या माध्यमातून बालक विक्रीचे रॅकेट.

देश : कोलकाता : ‘सरोगेट मदर’ च्या माध्यमातून बालक विक्रीचे रॅकेट.

 

‘सरोगेट मदर’ च्या माध्यमातून बालक विक्रीचे रॅकेट कोलकाता पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणात शंभरपेक्षा अधिक महिला तसेच तितकेच एजंट कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी यातील मुख्य सूत्रधार ममता पात्रा हिला अटक केली आहे.

पोलिसांनी चार दिवसांपूर्वी रूपाली मोडल आणि कल्याणी गुहा या दोघींना अटक केली होती. रूपाली तिच्या बालकाची कल्याणीला विक्री करणार होती. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर बालक विक्रीचे रॅकेट उघडकीस आले.

‘आयव्हीएफ’मध्ये महागडा खर्च करून अपत्य प्राप्त करणे शक्य नसलेल्या जोडप्यांना ‘आयव्हीएफ’ सेंटरमधील कर्मचारी जाळ्यात ओढत होते. ते त्यांना ममता पात्रा हिच्याशी संपर्क साधायला लावत असत,ममता त्यांना काही कालावधीत बाळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत असे. आर्थिक अडचणीत असणाऱ्या आणि गरीब महिलांशी एजंटांच्या माध्यमातून ममता संपर्क साधत असे. ती त्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपये देऊन तिला गर्भवती राहण्यासाठी सांगुन बाळाला जन्म द्यायला लावत होती. या बाळाची नंतर चार ते पाच लाख रुपयांना विनाअपत्य आणि आर्थिक सुबत्ता असणाऱ्या दाम्पत्याला विक्री केली जात असे.अपत्य विक्रीच्या रॅकेटमध्ये शहरातील एका ‘आयव्हीएफ’ सेंटरचाही समावेश असल्याचा संशय आहे. पोलिसांनी कोलकात्यामधील दक्षिणेकडील आनंदपूर परिसरातील ‘आयव्हीएफ’ सेंटरवर छापे टाकले आहेत.

Related posts

आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड शहरात गोळीबार.

pcnews24

आदिवासी तरुणाच्या ‘त्या ‘ व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी घेतली गंभीर दखल

pcnews24

पिंपरी चिंचवड : मोशी येथील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई.

pcnews24

पिंपरी-चिंचवड : पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे ‘ॲक्शन मोड’मध्ये;२४ टोळ्यांवर ‘मोक्का’

pcnews24

पिंपरी चिंचवड:थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त.४ दिवसांत ६८ मालमत्ता जप्त

pcnews24

कोर्टाच्या आवारात सुनेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

pcnews24

Leave a Comment