February 24, 2024
PC News24
राजकारण

अजित दादांकडून गिरीश महाजन यांच्या फिटनेसचं कौतुक;साठीच्या पुढे गेले पण….

अजित दादांकडून गिरीश महाजन यांच्या फिटनेसचं कौतुक;साठीच्या पुढे गेले पण….

पुण्याचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मोफत महाआऱोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होतं.याप्रसंगी अजित पवार बोलत होते. देशाच्या आणि राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे हीच अपेक्षा आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार होत आहे याबद्दल आभारी आहे. अलिकडे उपचाराचे खर्च वाढले आहेत, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं. आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट मंत्री गिरीश महाजन आहेत. साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले. इरशाळवाडी सारख्या ठिकाणी गिरीश महाजन ट्रेकिंग करत गेले. इरशाळवाडीत ते सर्वात आधी पोहोचले. त्या टेकडीवर ते एकटे चढून गेले. महाजनांनी त्यांचं आरोग्य फिट ठेवलं आहे. महाजनांचा दंड मी नेहमीच दाबून बघतो. ते खूप फिट आहेत, असं कौतुक करतानाच तुम्हीही फिटनेस ठेवा. आरोग्य सांभाळा असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामे करत आहोत. सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिकांकडून एक रुपया देखील घेतला जाणार नाही. सगळे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सांगतानाच सध्या राज्यभर डोळ्यांची साथ आहे. पुण्यात राज्यभरात सगळ्यात जास्त रुग्ण आहेत. साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. वयाच्या 40 नंतर रोज व्यायाम करा, व्यसनापासून दूर राहा, सिगारेट, दारु पासून दूर रहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Related posts

मराठा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून सरकार जाणीवपूर्वक वंचित ठेवतय का?शिंदे- फडणवीस सरकारवर सुनिल गव्हाणे यांची टिका

pcnews24

भाजपा उत्तर विभाग कार्यकारणीची निवड जाहीर;तळेगाव शहर अध्यक्षपदी अशोक दाभाडे यांची नियुक्ती.

pcnews24

भाजपच्या बड्या नेत्यासह 4 माजी नगरसेवकांचे राजीनामे

pcnews24

‘कोकणातील जमीनी विकू नका’ –  राज ठाकरे 

pcnews24

पुसेसावळी, सातारा दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांकडून सतर्कतेचे आदेश.

pcnews24

सरकारचा जीआर जरांगे पाटील यांना अमान्य- आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

pcnews24

Leave a Comment