February 24, 2024
PC News24
राजकारण

शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन; टीका मोदींवर

शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन; टीका मोदींवर

मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे भाजप व शिंदे यांच्यावर टीका केली. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. जवळपास 20 पेक्षा अधिक पक्ष हे एकत्र आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड बरोबर एकत्र येण्याची चाचपणी सुरू केली आहे. संभाजी ब्रिगेड हे मराठा कार्ड आणि पवारांच्या जवळील संघटना म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वी या विरोधकांच्या आघाडीची बैठक पार पडली. विरोधकांच्या आघाडीचं ‘इंडिया’, असं नामकरण करण्यात आलं. या इंडिया नावावरुन मोदींनी टीका केली होती. त्यावेळी मोदी म्हणाले होते, “ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावातही इंडिया होतं, असं म्हणत पीएम मोदी यांनी विरोधकांवर घणाघात चढवला होता. “यूपीए हे नाव बदनाम झालं आहे. त्यामुळे आता विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिलं आहे. मात्र, विरोधकांची ही आघाडी इंडिया नाही तर घमंडीया आहे.”, अशी टीकाही मोदींनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज प्रती उत्तर दिले आहे.

“इंडिया, भारत, भारतमाता ही देशाची नावं आहेत. मला मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही परदेशात जाता, बायडनला मिठी मारता, यांना मिठी मारता, त्यांच्याशी हस्तांदोलन करता. बाजूला उभे राहता, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी केली जाते. तेव्हा तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Related posts

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची किशोर आवारे यांच्या पत्नीची मागणी.

pcnews24

शरद पवार यांचा पुन्हा पावसात भिजलेला फोटो आणि सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल

pcnews24

बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.- राहुल कुल

pcnews24

आगामी निवडणुकांची समीकरणे बदलणार -एकनाथ पवार शिवबंधन बांधणार.

pcnews24

कोण संजय राऊत ? मी कोणाचे नाव घेतले होते का ? अजित पवारांची प्रतिक्रिया.

pcnews24

चिंचवड विभागात नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी : भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

pcnews24

Leave a Comment