February 24, 2024
PC News24
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय: अंजू उर्फ फातिमाच्या अडचणीत वाढ…अंजुला आता इकडे आड तर तिकडे विहीर…

आंतरराष्ट्रीय: अंजू उर्फ फातिमाच्या अडचणीत वाढ…अंजुला आता इकडे आड तर तिकडे विहीर…

पतीला व दोन मुलांना सोडून पाकिस्तानला गेलेली व त्यानंतर तिचा सोशल मीडिया मित्र नसरुल्लाहशी लग्न व त्यानंतर धर्म परिवर्तन करणारी अंजू उर्फ फातिमा भारतात परतण्याची वाट पाहत आहे. कारण नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूने आधी दोन-तीन दिवसांत भारतात परतणार असल्याचे सांगितले होते, त्यानंतर 4 ऑगस्टला परत येणार असल्याचे सांगितले. म्हणजेच अंजूच्या आधीच्या विधानांवर विश्वास ठेवायचा असेल तर अंजू पुढच्या काही तासांत भारतात असावी. पण अंजू खरंच भारतात परतणार का?असाच प्रश्न सीमेपलीकडील पाकिस्तानी लोकांच्या मनातही आहे. अंजू खरोखरच ४ ऑगस्टला भारतात परतणार का? की अंजूची ही कहाणी आता बदलली आहे? या प्रश्नाचे कारण पाकिस्तानात अंजूच्या कथेत सतत ट्विस्ट येत असतात. दरम्यान, अंजूने एका वृत्त वहिनीशी शेवटचा संवाद साधला तेव्हा अंजू म्हणाली की, तुम्ही लोकांनी आम्हाला परत येण्याच्या लायकीचे ठेवले नाही.

भारतातील परिस्थिती आता अंजूच्या बाजूने नाही हे उघड आहे. तिने केलेल्या कृत्यामुळे तिचा पती,वडील आणि मुले व सर्व नातेवाईक तिच्यावर खूप नाराज आहेत आणि अंजू स्वतः सर्व तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. अशा परिस्थितीत तिचे भारतात परतणे सध्या धोक्यात असल्याचे अंजूच्या बोलण्यातून दिसते.अंजू टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली होती आणि तिचा व्हिसाची मुदत २० ऑगस्टला संपत होती. म्हणजेच सध्या परिस्थिती अशी झाली आहे की अंजूला भारतात परतणे जितके कठीण आहे तितकेच तिचे पाकिस्तानात राहणेही कठीण आहे. अंजूसाठी आता इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. पाकिस्तानमधे ही तिने व्हिसाची मुदत वाढवून घेतल्याच्या बातम्या येत आहेत.

Related posts

अभिनंदन सुनील ! भारताने जिंकले सुवर्णपदक

pcnews24

भारतात मुस्लिमासोबत भेदभाव केला जातो ही एक अफवा : अजित डोवाल

pcnews24

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

26/11 हल्ल्यातील आरोपी भारतात आणणार.

pcnews24

जी-२० सदस्यांचा वारी सोहळ्यात सहभाग.’याची देही याची डोळा’ अनुभवली वारी (काही खास क्षणचित्रे)

pcnews24

अमेरिकेच्या नौदलाचे विमान कोसळले.

pcnews24

Leave a Comment