February 24, 2024
PC News24
तंत्रज्ञान

देश : भारताची बहुचर्चित मोहिम चांद्रयान 3 ने पाठवले चंद्राचे फोटो

देश : भारताची बहुचर्चित मोहिम चांद्रयान 3 ने पाठवले चंद्राचे फोटो.

भारताच्या इस्रोने पाठविलेले चांद्रयान 3 वेगवान पद्धतीने चंद्राच्या दिशेने झेपावतं आहे. पाच ऑगस्टला चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 3 ने चंद्राचे काही फोटो पाठवले आहेत. या फोटोमूळे इस्त्रोमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर संपूर्ण देशात याचीच चर्चा आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून हे फोटो आणि व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत.

चांद्रयान 3 आता चंद्राच्या भूमीपासून 170KM x 4313KM अंतर दूर आहे. तर 17 ऑगस्टपर्यंत चांद्रयान 3 ची कक्षा बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.

चंद्राच्या दक्षिण भागावर चांद्रयान 3 उतरणार आहे. याआधी चांद्रयान 1 ने या भागात पाण्याचे अंश असल्याचं शोधून काढलेलं. चांद्रयान 2 ही याच भागात उतरवलं जाणार होतं. पण ते यशस्वी झालं नाही. त्यानंतर आता चांद्रयान 3 इथं यशस्वीरित्या उरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Related posts

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

चांद्रयान 3ची कमाल ; शास्त्रज्ञही चकित.

pcnews24

भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज,चांद्रयान-3 मोहिमेचे 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपण

pcnews24

गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी अलर्ट जारी!!

pcnews24

पुणे:वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात लवकरच तीन नवे उड्डाणपूल.

pcnews24

डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय

pcnews24

Leave a Comment