February 24, 2024
PC News24
राजकारण

N.D.A vs I.N.D.I.A;दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर.

N.D.A vs I.N.D.I.A;दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर.

अखेर बहुचर्चित दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय. मोठी चर्चा,खडाजंगी,आरोप-प्रत्यारोप आणि अटीतटीचं मतदान झाल्यानंतर देखील विरोधकांच्या पदरी निराशाच पडली आहे. दिल्ली सेवा विधेयक 29 मतांच्या फरकाने राज्यसभेत मंजूर झाले आहे.हे विधेयक लोकसभा पाठोपाठ आता राज्यसभेतही मंजूर झाल्याने आता केंद्राला दिल्लीत अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार मिळणार आहेत.

आम आदमी पक्षाने पूर्ण जोर लावून सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करून देखील त्यांचा विरोध डावलून केंद्र सरकारने विधेयक मंजूर केलं आहे.विधेयक मंजूर होताना राज्यसभेत बाजूच्या आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक बघायला मिळाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विधेयक मांडलं. त्यानंतर विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पण अखेर 29 मतांच्या फरकाने हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.अधिकाऱ्यांच्या बदलीचे सर्व अधिकार हे नायब राज्यपाल किंवा केंद्र सरकारकडे असणार आहेत.

देशभरात आज सकाळपासून या विधेयकाची चर्चा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं. अमित शाह यांनी विधेयक मांडल्यानंतर राज्यसभेत आज जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अमित शाह यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद रंगताना बघायला मिळाला. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे स्वत: व्हिल चेअरवर या विधेयकासाठी सभागृहात उपस्थित होते. कारण सगळ्याच राजकीय पक्षांनी व्हीप काढला होता.

दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने 131 मते पडली. तर विरोधात 102 मते पडली. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदानावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पत्रकं देवून मतदान पार पडलं. या मतदानात दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने 131 मतं पडली. हा मोदी( N.D.A)सरकारचा I.N.D.I.A वर मोठा विजय मानला जातो.

Related posts

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलला.भाजपला धक्का.

pcnews24

राहुल गांधींनचा निकाल हायकोर्टाने ठेवला राखून.

pcnews24

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रविवारी पिंपरी चिंचवड शहरात.

pcnews24

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खबरदारी नागरिकांना ‘ORS’चे वाटप

pcnews24

महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी!!

pcnews24

‘…म्हणून पंकजा मुंडेंचे नुकसान’: चंद्रकांत पाटील 

pcnews24

Leave a Comment