March 1, 2024
PC News24
न्यायव्यवस्था

महात्मा गांधी वादग्रस्त वक्तव्य;भिडे गुरुजींचे नाव याचिकेतून वगळण्याचा हायकोर्टाचा आदेश.

महात्मा गांधी वादग्रस्त वक्तव्य;भिडे गुरुजींचे नाव याचिकेतून वगळण्याचा हायकोर्टाचा आदेश.

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणी वरून,आज सकाळी युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर त्यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने भिडे गुरुजीयां यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भिडे गुरुजी यांनी केलेल्या विधानामुळे सर्वत्र आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी त्यांच्यावर तक्रार देखील दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या अमरावती पोलिस करत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.

आता उच्च न्यायालयाने या बाबत मात्र सध्या तरी भिडे गुरुजीना दिलासा दिला आहे. न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठाने याचिका कर्त्याला निर्देश देताना म्हंटले, की वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेक प्रकरणे आजवर घडली आहेत,. परंतु, केवळ भिडे गुरुजींचेच नाव याचिकेत का? त्यामुळे जनहित याचिका केवळ एका व्यक्ती विरोधात दाखल करता येत नाही. त्यामुळे भिडे गुरुजींचे नाव यातून वगळावे. तर तुम्हाला जो निर्णय द्यायचा तो द्या आम्ही हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात न्यायचं का ते ठरवू, असं याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून कोर्टात सांगण्यात आले आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲड प्रमिला गाडे..

pcnews24

ग्राहक मंच तर्फे SBI ला 2 लाखांचा दंड

pcnews24

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम घोषणांवर बंदी.

pcnews24

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीला 154 कोटींचा दंड.

pcnews24

हाणामारी ! वकील महिला-पुरुष कोर्टातच भिडले(व्हिडिओ सह)

pcnews24

न्यायमूर्ती रमेश डि धानुका यांनी घेतली शपथ

pcnews24

Leave a Comment