March 1, 2024
PC News24
गुन्हा

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक;५ कोटींचा अपहार.

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक;५ कोटींचा अपहार.

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ५ कोटींची फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे ( रा.पाषाण) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यासह भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी पाहिजे होती. जून २०१९ मध्ये सूर्यवंशी यांची भेट आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगितले. आरोपी दादासाहेबने त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसरमध्ये २७ लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्या नंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली.

दरम्यान त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात संगनमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Related posts

युट्युब चॅनल टास्क सबस्क्राईबच्या बहाण्याने 76 लाखाला गंडा.

pcnews24

वाकड:संशयास्पद हालचालीवरून पकडलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक -एक वर्षापासून होता फरार.

pcnews24

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला.

pcnews24

वाघोली, पुणे:७० वर्षीय निवृत्त बँक मॅनेजर खूनाची धक्कादायक घटना.. ताम्हीणी घाटात सापडला मृतदेह

pcnews24

चिखली:मुख्याध्यापकाला जातीवाचक शिवीगाळ एकावर गुन्हा दाखल.

pcnews24

अरे बापरे!!! मंत्रालयातील जाळीवर उडी मारून शेतकऱ्यांचे आंदोलन.पहा व्हिडीओ सह.

pcnews24

Leave a Comment