February 24, 2024
PC News24
राजकारण

‘प्रभाग क्र 17,शिवसेना प्रभाग निहाय आढावा बैठक उत्साहात

‘प्रभाग क्र 17,शिवसेना प्रभाग निहाय आढावा बैठक उत्साहात.

पिंपरी : संत तुकाराम नगर प्रभाग क्र 17 येथे शिवसेना प्रभाग निहाय आढावा बैठक आयोजित केली होती. त्यासाठी प्रमुख उपस्थिती पिपंरी विधानसभा संपर्क प्रमुख श्री. केसरीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीस शहरप्रमुख व नगरसेवक ॲड.सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमीभाई संधू, शहर संघटिका सौ. अनिता ताई तुतारे, पिपंरी विधानसभा प्रमुख तुषार नवले*, उप शहर प्रमुख अमोल निकम, पांडुरंग पाटिल, गोरख नवघणे, कुदळे, वाहतूक प्रमुख संजयदादा यादव, विभागप्रमुख ऍड दत्ताराम साळवी,संघटक भोलाराम पाटील, समन्व्यक गणेश रोकडे, उपविभाग प्रमुख पुरुषोत्तम वाईकर, विशाल चव्हाण,रवींद्र मांडवे,शाखा प्रमुख रोहित लोणारे, युवा सेनेचे गौतम लहाने, विजय ढोबळे, महिला आघाडीच्या लक्ष्मी काची, संगीता भारती, प्रिया निकम, प्रतिभा वानखेडे,पल्लवी लहाने, इत्यादी अनेक शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती. ही बैठक संतोष देविदास म्हात्रे याच्या घरी संपन्न झाली. यासाठी सर्व शिवसेना व अंगीकृत संघटनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार संतोष म्हात्रे व नीलम संतोष म्हात्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन करण्यात आला.
महत्त्वाचे म्हणजे SRA प्रकल्पावरती चर्चा झाली त्यात प्रामुख्याने लक्ष्मी काची, संगीता भारती प्रतिभा वानखेडे, सुरेश भिसे, संगीता खरात यांनी सविस्तर केसरीनाथ पाटील साहेब व ॲड. सचिन भोसले यांच्या बरोबर चर्चा केल्या.

केसरीनाथ पाटील यांनी आता लागा तयारीला यावेळेस मैदानात संपूर्ण तयारीनिशी उतरायचं, तसंच पॅनलच्या पॅनल उमेदवार निवडून आणायचे असे सांगितले त्यामुळे सर्व शिवसैनिकां मध्ये एक प्रकारचे चैतन्य होते.

Related posts

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा,अजित पवार कार्यक्रम संपताच गैरहजर.

pcnews24

मनसेच्या उपशाखाप्रमुखाचा मृत्यू

pcnews24

बृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार,परंतु खेळाडूंनची अटकेची मागणी‌.

pcnews24

आदित्य ठाकरे जाणार मथुरा दौऱ्यावर.

pcnews24

शरद पवारांचे खळबळजनक विधान,दूटप्पी विधानाने कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत.

pcnews24

‘…म्हणून पंकजा मुंडेंचे नुकसान’: चंद्रकांत पाटील 

pcnews24

Leave a Comment