February 24, 2024
PC News24
कला

संस्कार भारती आणि नटेश्वर नृत्यकला मंदीर आयोजित नृत्य मासिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

संस्कार भारती आणि नटेश्वर नृत्यकला मंदीर आयोजित नृत्य मासिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी : संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती व नटेश्वर नृत्यकला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्य मासिक सभा पुष्प २अंतर्गत शास्त्रीय नृत्याचे बहारदार सादरीकरण झाले. पिंपरी मोरवाडी,येथील विरंगुळा केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती नृत्य विधेच्या वतीने शहर व उपनगरात संस्कार भारतीचे कार्य पोहचावे तसेच शास्त्रीय नृत्य संवर्धन करणाऱ्या संस्था आणि नृत्य शिकणाऱ्या नवोदित कलासाधकांना,
कला रसिकांना संस्कार भारतीशी जोडून घेणे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी नटेश्वर नृत्यकला मंदिर ह्या संस्थेच्या संचालिका गुरू सौ शिल्पा भोमे ह्यांच्या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. त्यात त्यांनी देवी स्तुति, ताल त्रिताल, तराणा, ठुमरी तसेच गीताउपदेश व ‘गरज आज मेघा’ ह्या उपशास्त्रीय गीतावरही नृत्य सादरीकरण केले. तसेच गुरू श्रुती परांजपे व त्यांच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम् ह्या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये गणेश वंदना, नवरस ,नटेश कौतुकम,मिश्रचापू ,अलारिपू, नक्षत्र राशी ह्या रचना अतिशय उत्कृष्ट सादर केल्या. यात एकूण २२नृत्य कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली.

पिंपरी चिंचवडमधील विविध ठिकाणी प्रत्येक महिन्याला अशी मासिक सभा आयोजित केली जाते. परिसरातील नृत्य कलासाधकांनी यामध्ये जरूर सहभागी व्हावे असे आवाहन समिती नृत्य विधा संयोजिका सौं. वरदा वैश्यपायन यांनी केले.
स्थानिक प्रेक्षकांचा ह्या कथ्थक आणि भरतनाट्यम् शास्त्रीय नृत्य प्रकारास भरभरून प्रतिसाद मिळाला.
नृत्य मासिक सभेच्या कार्यक्रमास संस्कार भारती पश्चिम प्रांताच्या उपाध्यक्ष सौ. सुवर्णा बाग,पिंपरी चिंचवड समिती अध्यक्ष श्री. सचिन काळभोर,नृत्य विधा प्रमुख सौ. वरदा वैशंपायन,सहविधा प्रमुख सौ.स्वप्ना रत्नाळीकर कुर्डुकर ,सौ. सुजा दिनकर उपस्थित होत्या. या उपक्रमाला मोरवाडी परिसरातील रसिक प्रेक्षकांची चांगली उपस्थिती होती

Related posts

मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची राज्य कार्यकारिणी जाहीर – धर्मवीर संभाजी महाराज जयंतीचे औचित्य.

pcnews24

ज्येष्ठ अभिनेत्याला दोन महिन्याची जेल!!

pcnews24

भोसरीतील गायत्री इंग्लिश स्कूलचा आदर्शवत उपक्रम!!

pcnews24

बालेवाडी:अखिल भारतीय राजभाषा परिषदेचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा,14 आणि 15 सप्टेंबर बालेवाडी येथे परिषद.

pcnews24

‘जर तर ची गोष्ट’ला मोठी पसंती…

pcnews24

पुणे:शब्दसुरांचा अनोखा संगम.

pcnews24

Leave a Comment