March 1, 2024
PC News24
महानगरपालिका

महापालिकेच्या वतीने खड्डे दुरूस्तीसाठी विशेष पथकांची नेमणूक

महापालिकेच्या वतीने खड्डे दुरूस्तीसाठी विशेष पथकांची नेमणूक

पिंपरी :(दि.८ ऑगस्ट) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रा मधील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीसाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ वाहन, २ मजूर आणि दुरूस्तीकामी आवश्यक असणाऱ्या बांधकाम साहित्याचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आठवड्यातील सर्व दिवस ही विशेष पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.
चिखली सोनवणे वस्ती रस्ता,तळवडे रूपीनगर मुख्य रस्ता, टॉवर लाईन रस्ता, चिखलीगाव रस्ता, चिखली मोरेवस्ती येथे वाघु साने चौक ते चिंचेचा मळा रस्ता, मुकाई चौक ते किवळे गावात जाणारा रस्ता तसेच पुनावळे अंडरपास ते गायकवाड नगर आणि कोयते वस्ती येथील रस्त्यावरील बुजविलेल्या खड्ड्यांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्यांवर आढळलेले विविध ठिकाणचे खड्डे तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच पावसाळ्यानंतर रस्त्याचे खड्डे डांबराने किंवा कोल्डमिक्स पध्दतीने भरून घ्यावेत असे निर्देशही दिले.
यावेळी सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, देवान्ना गट्टूवार, उप अभियंता शालीग्राम अंदुरे उपस्थित होते.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खड्डे बुजविण्याचे हे काम विशेष पथकांकडून सुरू आहे. नागरिकांकडून तक्रार मिळताच खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पुर्ण केली जाणार असल्याची माहिती सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी दिली आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिका: स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या शहरातील विविध विकास कामांना शेखर सिंह यांनी दिली मान्यता

pcnews24

चिंचवडमधील मोठ्या नेत्यांची घरवापसी होणार!!

pcnews24

शाळांमध्ये पथनाट्यातून करणार स्वच्छते विषयी जागृती.महापालिकेच्या वतीने स्वच्छता,पंधरवडा निमित्त आयोजन

pcnews24

जनसंवाद सभेला येणारे ‘तेच ते नागरिक’ करतात चढ्या आवाजात तक्रारी.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अवैध वृक्षतोड.. कारवाईसही टाळाटाळ?

pcnews24

निगडी बस स्टॉप ते इन्स्प्रिया मॉल ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतूक कोंडी,रस्त्यावर झोपून आंदोलनाचा इशारा.सचिन काळभोर

pcnews24

Leave a Comment