February 24, 2024
PC News24
न्यायालय

इंदुरीकरां विरोधात खटला चालणार;कनिष्ठ कोर्टाच्या आदेशा विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

इंदुरीकरां विरोधात खटला चालणार;कनिष्ठ कोर्टाच्या आदेशा विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरूद्ध खटला चालावला जाणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कनिष्ठ कोर्टाने दिलेल्या आदेशाविरुद्ध इंदुरीकर महाराज यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती ती कोर्टाने फेटाळली आहे. पुत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या विधानावरून संगमनेरच्या कनिष्ठ कोर्टाने दिलेला खटला चालविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. हा इंदुरीकर महाराज यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नातून हा खटला दाखल करण्यात आला होता.

‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य एका कीर्तनादरम्यान राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरुवातीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच संगमनेरच्या कनिष्ठ कोर्टाने याबाबतचा खटला चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशा विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.मात्र आज कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

काही महिन्यांपूर्वी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्माबाबत एक वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांना जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. इंदुरीकरांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते.

Related posts

अदानींविरोधात पुरावे काय आहेत ?

pcnews24

पहिल्या विवाहाची माहिती लपवून ठेवत दुसरे लग्न…दुसऱ्या पत्नीचाही छळ.

pcnews24

‘… तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’

pcnews24

ज्येष्ठ अभिनेत्याला दोन महिन्याची जेल!!

pcnews24

पुणे:ड्रग्ज प्रकरणी पोलीसांकडून गोपनीय अहवाल सादर.

pcnews24

Leave a Comment