February 24, 2024
PC News24
आरोग्य

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाचा मृत्यू.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाचा मृत्यू.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचितशी वाढली आहे. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या कोरोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली आहे. तसेच कोरोनाचा ओमायक्रॉन EG.5.1 हा नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे. देशात पहिल्यांदाच या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे.

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधक आणि महाराष्ट्राच्या जिनोम सिक्वेन्सिंगचे संयोजक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट सापडला होता. मात्र, त्यानंतर जून आणि जुलैमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या लक्षणीय नव्हती. गेल्या दोन महिन्यात राज्यात केवळ XBB.1.16 आणि XBB.2.3 व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलै अखेरपर्यंत राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७० इतकी होती. पण ६ ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ११५ इतकी होती. तर सोमवारी नोंदवण्यात आलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १०९ इतकी आहे. रुग्णांची संख्या वाढण्यासाठी ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट कारणीभूत ठरत असल्याचे समजते. यापूर्वी EG.5.1 व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्हेरिएंटमुळे इंग्लंडमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.

सद्यस्थितीत मुंबईत करोनाचे सर्वाधिक ४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात ३४ आणि ठाण्यात करोनाचे २५ सक्रिय रुग्ण आहेत. तर रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये करोनाचा प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता करोना रुग्णांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली नसली तरी आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

प्रत्येक आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. जून ते सप्टेंबर या काळात श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे रुग्णांची संख्या कोरोना मुळेच वाढली आहे का, हे तपासले जाईल. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये किंचितशी वाढ नक्कीच झाली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

Related posts

वाढत्या तापमानात घ्या आरोग्याची काळजी.

pcnews24

भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत

pcnews24

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

वाढत्या उष्णतेमुळे २१ एप्रिलपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर.

pcnews24

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर ‘आपला दवाखाना’

pcnews24

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

Leave a Comment