February 24, 2024
PC News24
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड : टाळगाव चिखली आणि तळवडे रस्त्याची कामे मार्गी;आमदार महेश लांडगे.

पिंपरी चिंचवड : टाळगाव चिखली आणि तळवडे रस्त्याची कामे मार्गी;आमदार महेश लांडगे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत टाळगाव चिखली आणि तळवडे भागातील अंतर्गत रस्तयांच्या कामांसाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि रहदारी याचा विचार करुन तात्काळ रस्त्याची कामे मार्गी लावावीत, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याची प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात हे रस्ते ‘ट्रॅफिकमुक्ती’च्या दिशेने….

चिखली चौक ते सोनवणेवस्तीकडे जाणारा 24 मी. रुंद रस्ता विकसित करणे. प्रभाग क्रमांक 12 मधील त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौकापर्यंत 24 मीटर रस्ता विकसित करणे. प्रभाग क्रमांक 12 मधील तळवडे कॅनबे चौक ते भक्ती शक्ती चौकापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाणारा उर्वरित 24 मीटर रस्ता विकसित करणे.

प्रभाग क्रमांक 1 चिखली मधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपिठकडे जाणारा 18 मीटर रुंद डीपी रस्ता व इतर डीपी रस्ते विकसित करणे. चिखली मधील साने चौक ते चिखली चौक रस्ता मंजूर विकास आराखड्यानुसार विकसित करणे. चिखली मधील देहू आळंदी ते सोनवणे वस्ती कडे जाणारा 30 मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे.

प्रभाग क्रमांक 12 मधील नदीच्या कडेने जाणारा मंजूर विकास योजनेतील रस्ता विकसित करणे 12 मीटर रुंद आदी रस्त्यांच्या कामांना गदी देण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली आणि तळवडे परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करुन शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडल्यास ‘कनेक्टिव्हीटी’ वाढणार आहे.

महापालिका विकास आराखड्यानुसार (DP) रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्यात यावी. त्यामुळे समाविष्ट गावांतील नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. शहरात समातोल विकासाचे सूत्र प्रभावीपणे राबवायचे असेल, तर प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी आणि रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली होती.त्याला प्रतिसाद देत रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत आहेत. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात करावी, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

Related posts

पिंपरी चिंचवड:उद्योजक आणि महावितरण अधिका-यांची महत्वपूर्ण बैठक,लघुउद्योग संघटनेने केल्या या मागण्या.

pcnews24

ऑलिम्पिक वर्ल्ड गेम मध्ये सुवर्णपदक विजेत्या गायत्रीला महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती मंजूर.

pcnews24

निगडी येथे दिवसभर वीजपुरवठा बंद..वाचा काय कारणे..

pcnews24

महापालिका ‘या’ मोक्याच्या जागा देणार पार्कींगसाठी-खासगी संस्थांकडून मागविले प्रस्ताव

pcnews24

रा.स्व.संघातर्फे उद्या पिंपरी चिंचवड शहरात पथसंचलन-२५ स्थानी स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन.

pcnews24

महाराष्ट्र :मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा २०२३ मधे महापालिकेचा सहभाग.

pcnews24

Leave a Comment