February 24, 2024
PC News24
धर्म

पुणे : आंबेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोबाईल वापरण्यास बंदी.

पुणे : आंबेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोबाईल वापरण्यास बंदी.

यंदाच्या वर्षी अधिक आणि श्रावण महिना एकत्र आल्यामुळे तीर्थक्षेत्रावर गर्दी होताना पहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यात बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होत असल्याने आणखी गर्दी होणार आहे. त्यामुळे भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

भीमाशंकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात. श्रावण महिन्यात गर्दी वाढ होणार आहे.दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. गर्दीत अनेक अनुचित प्रकार घडत असतात. त्याचा त्रास मंदिर प्रशासनाला सहन करावा लागतो. मात्र यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते मंदिर परिसरात मोबाइल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात फोटो काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमामुळे भक्ती-शक्ती चौकातील वाहतुकीत शनिवारी बदल.

pcnews24

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवप्रेमी देणार शनिवारी मानवंदना,शिवजयंती समन्वय समिती आणि ढोल ताशा महासंघाने केले आयोजन.

pcnews24

महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश मराठा समाजावर अन्याय करणारा- न्यायप्रिय अहवाल काढण्याची मागणी विजयकुमार पाटील.

pcnews24

शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार

pcnews24

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न

pcnews24

मनीषा बाठे लिखित समर्थ रामदासांवरील तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित

pcnews24

Leave a Comment