February 24, 2024
PC News24
राजकारण

देश : सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली;सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर;अमित शहा.

देश : सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली;सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर;अमित शहा.

मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपने सत्तेत आल्यापासून ९ सरकारं पाडली, अशी सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती.

विरोधकांच्या आरोपाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना अडचणीत आणलं. मणिपूरमधील हिंसाचारावरील आरोपांना आणि विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला अमित शहा यांनी सरकार भूमिका मांडत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या चर्चेसाठी विरोधकांना पत्र दिलं होतं. सरकार चर्चेला तयार नाही, असा संभ्रम निर्माण केला गेला. आम्ही या मुद्द्यावर पहिल्या दिवसापासून चर्चेला तयार होतो. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवर राजकारण करणं हे दुर्दैवी आहे असे घणघनाती भूमिका अमित शहा यांनी मांडली.

अमित शहा सुप्रिया सुळेंना उत्तर देताना म्हणाले “सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही सरकारं पाडली. सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रात सर्वप्रथम सरकार पाडलं ते शरद पवार यांनी आणि वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून भारतीय जनसंघाचा पाठिंबा घेऊन त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री झाले” सुप्रिया सुळे यांनी अमित शहांना पुन्हा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एस. एम. जोशी हे त्यावेळी निमंत्रक होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे बोलायला उठल्या त्यावेळी अमित शहा जागेवर बसले. त्यावेळी एस. एम. जोशी निमंत्रक होते, हे सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकून अमित शहा पुन्हा उठले. एस. एम. जोशी निमंत्रक होते तरीही मुख्यमंत्री कोण बनलं? सत्ता कोणी उपभोगली? शरद पवारच त्यावेळी मुख्यमंत्री झाले होते, असं म्हणत अमित शहा यांनी प्रतिउत्तर दिलं.

Related posts

शरद पवारांच्या आत्मचरित्रातील आरोपावर उध्दव ठाकरेंची सावध प्रतिक्रिया

pcnews24

भाजपची आता एवढ्या राज्यांत सत्ता.

pcnews24

वंचित म्हणजे पायात पाय घालणारी B टीम : शरद पवार

pcnews24

‘ ई डी चा धाक… शरद पवार बाप..’ नाशिकमध्ये NCP कार्यालयावरून अजित पवार गट व शरद पवार गट आमने सामने, प्रचंड घोषणाबाजी.

pcnews24

महविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ सभेचे ‘पिंपरी चिंचवडमधे जोरदार आयोजन.

pcnews24

‘भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार’- नाना पटोले.

pcnews24

Leave a Comment