February 24, 2024
PC News24
गुन्हा

कोयता गँगची पिंपरी-चिंचवड येथे दहशत

कोयता गँगची पिंपरी-चिंचवड येथे दहशत.

पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली परिसरात सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. हातात कोयते नाचवत, एकावर वार करण्यात आला. तसेच वाहनांची तोडफोड करत, रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातून दागिने काढून घेतले आणि मोबाईल हिसकावून त्यांनी पोबारा केला.आतापर्यंत फक्त कोयता गँग दहशत निर्माण करण्यासाठी वाहानांची तोडफोड करता होते. मात्र, आता या कोयता गँगची मजल सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे.त्यांचा हा धांगडधिंगा सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे.

पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या कोयता गँगने एकाच्या डोक्यात वार करून या युवकाला जखमी केलं आहे. या घटनेत जवळपास नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आली असून दोन महिलांचे दागिने आणि सहा मोबाईल हिसकावून या कोयता गँगच्या चोरांनी चोरून नेले आहेत. चौघांनी माजवलेल्या दहशतीने परिसरातील नागरिक भयभीत आहेत. या आरोपींचा माज मोडण्यासाठी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला असून त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून आरोपींचा शोध पोलिसां कडून घेतला जात आहे.

चिखली प्रमाणेच रावेत या ठिकाणी देखील या गँगने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी या प्रकाराला न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी केलं आहे.

Related posts

पालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार

pcnews24

हिंजवडी:सायबर गुन्हा: दाम्पत्याच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख 78 हजार रुपये गायब

pcnews24

LIC कंपनीला 84 कोटी रुपयांचा दंड.

pcnews24

दरोड्यातील कुख्यात आरोपींना काही तासातच मुद्देमाल व शस्त्रासह अटक.लातूर पोलिसांची कामगिरी.

pcnews24

पिंपरी चिंचवड : मोशी येथील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई.

pcnews24

पिंपरी चिंचवड: महापालिका प्रशासनाकडून अखेर बेकायदा रुफटॉप हॉटेलवर कारवाईस सुरूवात.

pcnews24

Leave a Comment