February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक.

पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे.या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

सुनील धोंडीभाऊ भालेकर (वय ४३ वर्ष, राहणार – कानहुर पठार, तालुका-पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ जून २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडलेला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुनील भालेकर हा तिच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी आहे. तो मागील दोन महिन्यापासून महिलेचा पाठलाग करत होता, महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे हातवारे करायचा, कामावर असताना शिट्टी मारायचा आणि तिला म्हणाला “तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, मला तू खूप आवडतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर” असे बोलून तिचा विनयभंग करून शिवीगाळ व धमकी दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम मधाळे याबाबत पुढील तपास करत आहेत.

Related posts

विमाननगर:तरुणीला मद्य पाजून हॉटेलमध्ये बलात्कार.

pcnews24

पुणे:पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली !!

pcnews24

रावेत येथील हॉटेल व्यवसायिकाचा पुण्यामध्ये खून

pcnews24

पुण्यात वाढते आहे कोयत्यांची दहशत

pcnews24

बहिणीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवावा अभिनेत्री भाग्यश्री मोटेची मागणी.

pcnews24

POCSO कायद्यांतर्गत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आंध्र प्रदेश हायकोर्टाने आज POCSO कायद्यांतर्गत ‘पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार’ सिद्ध करण्याच्या उद्देशासाठी वीर्य आवश्यक नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

pcnews24

Leave a Comment