February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

कुदळवाडी – चिखली परिसरातील बेवारस वाहनांवर व टप-यावंर कारवाई.

कुदळवाडी – चिखली परिसरातील बेवारस वाहनांवर व टप-यावंर कारवाई.

पिंपरी – पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिका क- क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त,प्रभाग क्र.२ मधील कुदळवाडी – चिखली परिसरातील बेवारस वाहनांवर व टप-यावंर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली .

पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे,अतिरिक्त आयुक्त २ विजय खोराटे,शहर अभियंता मकरंद निकम यांचे निर्देशानुसार व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,उप.अभियंता सुर्यकांत मोहिते,प्रशासन अधिकारी दशरथ कांबळॆ यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता रचना दळवी, प्रियंका म्हस्के, व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल,महाराष्ट्र पोलिस,यांच्या नियंत्रणा खाली ही कारवाई करण्यात आली.

प्रभाग क्र.२ मधील कुदळवाडी – चिखली परिसरातील २ बेवारस वाहनांवर व फ़ुटपाथ वरील ५ टप-यावंर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

आज या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, अग्निशमन दल सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करु नये,अनधिकृत टप-या व पत्राशेड उभारु नये, तसेच फ़ुटपाथ स्वच्छ  ठेवण्यासाठी सहकार्य करावे.

आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशा नुसार कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Related posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘विना वाहन वापर’ धोरणास देशात प्रथम क्रमांक.

pcnews24

व्हेरॉक वेंगसरकर अकादमीचा ‘अद्विक तिवारी’ सामनावीर.

pcnews24

डेंग्यू,चिकुनगुन्या आणि हिवताप याबाबत शहरवासियांनी काळजी घ्यावी – महानगरपालिकेचे आवाहन.

pcnews24

अक्षय तृतीये निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये महापूजा,प्रवचन,होणार.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अवैध वृक्षतोड.. कारवाईसही टाळाटाळ?

pcnews24

महापालिका ‘या’ मोक्याच्या जागा देणार पार्कींगसाठी-खासगी संस्थांकडून मागविले प्रस्ताव

pcnews24

Leave a Comment