February 24, 2024
PC News24
वाहतूकशाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

मोशी:स्कूलबसमध्ये ९२ विद्यार्थी;मोशीतील ‘एक्सलन्स स्कूल’ मधील धक्कादायक प्रकार.

मोशी:स्कूलबसमध्ये ९२ विद्यार्थी;मोशीतील ‘एक्सलन्स स्कूल’ मधील धक्कादायक प्रकार.

मोशी येथील ‘एक्सलन्स स्कूल’ शाळेच्या स्कूलबस मध्ये एकाचवेळी ९२ विद्यार्थी कोंबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित स्कूलबसची विद्यार्थी वाहतुकीती क्षमता केवळ ४२ होती. दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ५० विद्यार्थी अधिक बसविले होते. त्यांना श्वासही घेता येत नव्हता.

अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी बस पकडून कारवाई केली. त्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली.

एका आसनावर चार ते पाच विद्यार्थी दाटीवाटीने बसविण्यात आले होते. भरीसभर म्हणून दोन आसनरांगांमधील मोकळ्या जागेतही विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले. त्यांच्या बॅगाही तेथेच ठेवण्यात आल्या होत्या.ही बस बाहेरून पाहिली असता विद्यार्थी कोंबल्याचे दिसून येत होते.

दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड आरटीओचे एक पथक स्कूलबसची पाहणी करत असताना, मोशी येथे ही बस अधिकाऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली. अधिकाऱ्यांनी तातडीने बस थांबवून दाटीवाटीनेउभारलेल्या विद्यार्थ्यांना खाली उतरविले. त्यानंतर स्कूलच्या मुख्याध्यापकांना जागेवर बोलावून, सत्य परिस्थिती सांगितली. त्यानंतर बसचालकावर कारवाई करीत ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर दोन स्वतंत्र बसची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्यात आले.मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र कुलकर्णी, तानाजी धुमाळ, सहायक मोटार वाहन निरीक्षक तेजश्री कुलकर्णी, अनमोल चव्हाण, चालक प्रकाश खामकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‘एक्सलन्स स्कूल’च्या बसमध्ये नेहमीच विद्यार्थी क्षमतेपेक्षा जास्त भरले जातात. त्यातच त्यांची दुसरी बस नादुरुस्त झाल्याने एकाच बसमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होते. दररोज एका बसमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० ते ७२च्या घरात असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. एकाचवेळी ९२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकाकडे पक्के लायसन्स नसल्याचे आढळून आले आहे. याशिवाय त्याच्याकडे स्कूल व्हॅन चालविण्यासाठी आवश्यक बॅचही नसल्याचे दिसून आले आहे.आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार घडला,त्या वेळी त्याच्या अंगावर गणवेशही नव्हता.

शालेय व्यवस्थापन आणि शालेय परिवहन समिती यांनी विद्यार्थी वाहतुकीबाबत जागरूक राहायला हवे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षितपणे होत आहे की नाही,याकडे लक्ष द्यायला हवे. पालकांनीही पाल्याचा प्रवास कसा होतो, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले नाहीत ना, याची खात्री करायला हवी.आरटीओच्या माध्यमातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकी साठी सातत्याने तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.

Related posts

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर.

pcnews24

मराठा आंदोलनामुळे प्रवाशांना मनस्ताप तर STचे १५ कोटींचे नुकसान

pcnews24

सतत मुलांची मागणी मोबाईल असेल तर?

pcnews24

महाराष्ट्र:कोकणवासियांच्या गणेशोत्सव आनंदासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यात वाढ

pcnews24

महाराष्ट्र:SSC-HSC चा निकाल आज जाहीर होणार.

pcnews24

सरकारी शाळा ‘कार्पोरेट’ला दत्तक नको- सामान्य नागरिकाचे निवेदन,गरीब,बहुजन समाजातील मुले मोफत हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती ?

pcnews24

Leave a Comment