February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे : चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन.

पुणे : चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर जुना पूल पाडून नव्याने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि जुन्या उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आला. बहुचर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल येत्या शनिवारपासून (दि.12) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे. या नव्या उड्डाणपुलाला सुशोभीकरणाचा साजही देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई बेंगळुरू मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून दहा महिन्यांच्या विक्रमी काळात उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. मात्र अरुंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती.

चांदणी चौकातील या रस्त्यावर एनडीए, मुळशीकडून येऊन बावधन, पाषाण, वारजे आणि कोथरूडकडे जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असून एनडीए, मुळशी कडून येऊन मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. मुंबईकडून येऊन बावधन किंवा पाषाणला जाण्यासाठी महामार्गावरील पाषाण जोड रस्त्याने (विवा ईन हॉटेल) जाता येणार आहे.

मुंबईकडून येऊन मुळशीकडे जाण्यासाठी कोथरूड भुयारी मार्गाने एनडीए चौक मार्गे वेदविहार, मुळशी, एनडीएला जाता येणार आहे. बावधन, पाषाणकडून वारजे, कात्रजकडे जाण्यासाठी पाषाण कनेक्टर रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

कोथरूड ते वारजे ही वाहतूक सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावरील शृंगेरी मठाजवळून महामार्गाने जाणार आहे. वारजे, साताऱ्याकडून येऊन पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना नवीन उड्डापुलाच्या स्वतंत्र मार्गिकेवरून मुळशी रस्त्याला येता येणार आहे. यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Related posts

ओडिशात 3 गाड्या रुळावरून घसरल्याने 50 पेक्षा जादा ठार, 350 पेक्षा जास्त जखमी

pcnews24

PMPLच्या मार्गात गणेशोत्सवात तात्पुरते बदल..हे असतील पर्यायी मार्ग

pcnews24

महाराष्ट्र:4 हजार 277 खाजगी बसेसवर परिवहन विभागाची कारवाई.

pcnews24

मराठा आंदोलनामुळे प्रवाशांना मनस्ताप तर STचे १५ कोटींचे नुकसान

pcnews24

रेल्वेचा मोठा ब्लॉक;पुण्यातून सुटणाऱ्या काही रेल्वे रद्द तर काहींच्या वेळेत बदल

pcnews24

निगडी ते दापोडी द्रुतगती मार्गाचा नव्याने विकास करण्याची योजना

pcnews24

Leave a Comment