February 24, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

महानगरपालिका:अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या सकस आहारासाठी महापालिका मोजणार सव्वा दोन कोटी.

महानगरपालिका:अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या सकस आहारासाठी महापालिका मोजणार सव्वा दोन कोटी.

पिंपरी-चिंचवड शहरातील 208 अंगणवाडीतील 7 हजार 500 विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी इस्कॉनच्या अन्नामृत फाऊंडेशन या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना खजूर, लाडू, सुकामेवा व फळे असा दररोज सकस आहार देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 208 अंगणवाड्यात पाच वर्षांखालील 7 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात येते.

पालिकेच्या शिक्षण विभागाच्या त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये 9 पुरवठादार संस्थांनी सहभाग घेतला. त्यापैकी 8 पुरवठादार संस्था अपात्र ठरल्या.अन्नामृत फांउडेशनने 36 रुपये प्रति आठवडा असा सादर केलेला लघुत्तम दर स्वीकारण्यात आला आहे. दररोज विद्यार्थ्यांना सुका पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यात खजूर, लाडू, सुकामेवा व फळे असा आहार असणार आहे.त्यासाठी 2 खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये नुकतीच मान्यता दिली आहे.

208 अंगणवाडीतील दोन वर्षांसाठी 2 कोटी 21 लाख 76 विद्यार्थ्यांना हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.त्या लाभ नऊपैकी एकच संस्था पात्र अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये 9 संस्थांनी भाग घेतला होता. मात्र, कागदपत्रे व इतर बाबींमध्ये ते अपात्र झाले.

निविदा समितीने दुसऱ्यांदा प्रक्रिया केल्याने निविदा स्वीकारली. त्यानुसार, अन्नामृत फाऊंडेशनला सकस आहार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

Related posts

मुंबई मध्ये ४,३०० आमदारांनची वर्णी,काय आहे प्रकार?

pcnews24

शालेय मुलांना सुट्टी साठी PMPML ची मोठी परवणी.काय आहे खास जाणून घ्या.

pcnews24

“भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय”- राज्यातील पहिल्या संगीत विद्यालयाचे उद्या भूमिपूजन.

pcnews24

पुण्याचा विद्यार्थी भारतात पाचव्या क्रमांकावर.

pcnews24

‘एआयने नोकऱ्या जाणार नाहीत’: बिल गेट्स.

pcnews24

चिंचवड: श्री साईनाथ बालक मंदिर मध्ये रंगला बालचमूंचा पालखी सोहळा. 

pcnews24

Leave a Comment