March 1, 2024
PC News24
देश

तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत हे आहेत नियम.

तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत हे आहेत नियम.

२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.

तिरंगा ध्वज फडकावण्याबाबतचे नियम

१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.

२. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

३. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

४. तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.

५. तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.

६. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.

७. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.

८. फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे.

९. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.

१०. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.

Related posts

‘ब्रिजभूषण शरण सिंगविरोधात पुरेसे पुरावे’

pcnews24

दक्षिण भारतीय राज्यातून भाजप बाहेर !

pcnews24

इंडिगो हवाई कंपनीचा सुवर्ण त्रिकोण,पुण्यातील हवाई मार्गांमध्ये इंडिगोद्वारे वाढ.

pcnews24

ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन- चांद्रयान लाँचिंग काउंटडाउन देणारा आवाज हरपला.

pcnews24

१८ वर्षांनंतर आपले नाव मतदार यादीत थेट सामील होईल.

pcnews24

चंद्रयान-३ चे रोव्हर चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ.

pcnews24

Leave a Comment