February 24, 2024
PC News24
गुन्हा

महाराष्ट्र:सायबर चोरट्यांकडून तरुणी आणि तिच्या आईची 50 लाखांची फसवणूक.

महाराष्ट्र:सायबर चोरट्यांकडून तरुणी आणि तिच्या आईची 50 लाखांची फसवणूक.

एका 25 वर्षीय तरुणीने या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि “आम्ही मुंबई अँटी नार्कोटिक्स ब्युरोमधून बोलतोय, तुमचे पार्सल आले असून त्यात ड्रग्स आहेत आणि तुमच्या वर कारवाई केली जाईल” असे सांगून “स्काईप लिंक पाठवतो. त्यावर नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी बोलतील” असं सांगून सायबर चोरट्यांनी एक बनावट अकाऊंट तयार करून तरुणीला ऑनलाईन मीटिंग करण्यासाठी बोलावले. मीटिंग मध्ये तरुणी आणि त्यांच्या आईचे बँकेचे अकाऊंट वेरिफाय करायला लागेल असं सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

कारवाई होऊ द्यायची नसेल आणि अकाऊंट वेरीफाय करून द्यायचा असेल तर सांगतो त्या खात्यात पैसे भरा असे सांगितले असता तरुणी आणि त्यांच्या आईने मिळून सायबर चोरट्यांच्या खात्यात तब्बल 53 लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे ही सगळी घटना अवघ्या 4 ते 5 तासात घडली.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन करण्यात आला त्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

अज्ञात चोरट्यांनी कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून केली एक लाखांची चोरी

pcnews24

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

pcnews24

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.

pcnews24

निगडी:केवळ चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितले आणि…?? व्यापाऱ्यांकडून बंदची हाक

pcnews24

पुणे रेल्वे स्टेशच्या भुयारी मार्गात महिलेचा विनयभंग

pcnews24

विमाननगर:तरुणीला मद्य पाजून हॉटेलमध्ये बलात्कार.

pcnews24

Leave a Comment