February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी अर्ज भरण्यास मुदत,वाढीची आयुक्तांकडे मागणी:सचिन काळभोर.

पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी अर्ज भरण्यास मुदत,वाढीची आयुक्तांकडे मागणी:सचिन काळभोर.

महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या ९३८ सदनिकांसाठी अर्ज भरण्याची पहिली मुदत २८ जून ते २८ जुलै पर्यंत होती. त्यानंतर उद्या १२ ऑगस्टपर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली होती.मात्र केवळ ८३८३ अर्ज आले असून अजूनही अनेक अर्जदार बाकी आहेत त्यांनाही या घरांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे.

तहसील कार्यालयाकडून दाखले उपलब्ध होत नाहीत म्हणुन अजूनही अनेक कामगार,नागरिक अर्ज करण्याचे बाकी आहेत.सदरचा फॉर्म भरण्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट व उत्पन्नाचा दाखला तसेच जातीचा दाखला हे महत्त्वाचे असून सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी आहेत.

तहसीलदार कार्यालयात अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे यांचेकडून प्रमाणपत्रासाठी २०ते २५ दिवस लागत आहेत. यामुळे अनेक लोकांची इच्छा असूनही ते केवळ त्यांना आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत. यापूर्वीच्या ज्या ज्या वेळी अशा प्रकारे अर्ज मागवण्यात आले त्यावेळेला ४० ते ५० हजार अशा मोठ्या प्रमाणात अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते.आता केवळ ८३८३ अर्ज प्राप्त झाले आहेत . सध्याच्या कालावधी मध्ये ह्या प्रमाणपत्राची अट असल्यामुळे व ते वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक नागरिकांचे अर्ज करणे बाकी आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांची घरांची संधी जाऊ नये म्हणून हे अर्ज करण्यासाठी १०सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी समाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

Related posts

शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.

pcnews24

महानगरपालिका:बेशिस्तपणा व गैरवर्तन करणारे आरोग्य निरीक्षक सेवेतून निलंबित

pcnews24

पिंपरी चिंचवड:नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; संदीप वाघेरे यांची मागणी

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

pcnews24

नागरिकांनी माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती देणे बंधनकारक, शासकीय कर्मचाऱ्यांनचा सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा : प्रमुख प्रशिक्षक दादा बुले.

pcnews24

पिंपरी चिंचवड:राज्य बालहक्क संरक्षण आयोग सदस्यांची वायसीएम रुग्णालयाचा भेट.

pcnews24

Leave a Comment