February 24, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

पिंपरी:राज्यपाल रमेश बैस पदवीदान समारंभासाठी पिंपरीत येणार.

पिंपरी:राज्यपाल रमेश बैस पदवीदान समारंभासाठी पिंपरीत येणार.

सोमवारी डॉ.डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या 14 व्या पदवी प्रदान राज्यपाल रमेश बैस सोमवारी (दि.14) पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील(अभिमत) विद्यापीठाच्या 14 व्या पदवी प्रदान समारंभासाठी उपस्थित रहाणार आहेत.

पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता हा समारंभ होणार असून या कार्यक्रमात कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. पी. एन. राजदान, यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखां मधील परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्या शाखेतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 3015 पदव्युत्तर पदवी, 1055 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.

Related posts

राज्यात आजपासून शुन्य सावली दिवस अनुभवता येईल

pcnews24

मोशी:स्कूलबसमध्ये ९२ विद्यार्थी;मोशीतील ‘एक्सलन्स स्कूल’ मधील धक्कादायक प्रकार.

pcnews24

शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याची मागणी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

pcnews24

पिंपरी चिंचवड:शाळांचा गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची-आयुक्त सिंह

pcnews24

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग.

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे पैसे मिळणार थेट बँक खात्यावर

pcnews24

Leave a Comment