February 24, 2024
PC News24
वाहतूक

चांदणी चौक:केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते चांदणी चौक नव्या पुलाचे लोकार्पण.

चांदणी चौक:केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते चांदणी चौक नव्या पुलाचे लोकार्पण.

वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज (दि.12) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, रूपाली चाकणकर हे उपस्थित आहेत.

दरम्यान, वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती. त्यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते पण हे काम भूसंपादनामुळे रखडले होते.

त्यानंतर प्रत्यक्ष 2019 मध्ये कामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला होता. भूमिपुजनानंतर तब्बल 6 वर्षांनी हे काम पुर्णत्वास जात असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे.

Related posts

देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

pcnews24

पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम तीन महिन्यात सुरू होणार?

pcnews24

मध्य रेल्वेत मेगा भरती.

pcnews24

सावधान! जाणून घ्या व्हायरल झालेला वाहतूक दंड वसूलीचा बनावट संदेश- वाहतूक पोलिसांनी केले नागरिकांना सतर्क.

pcnews24

एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाचे महत्वपूर्ण पाऊल….अधिकृत थांब्यावर नाश्ता ३० रूपयांना मिळणार

pcnews24

पुणे जिल्हा:ट्राफिक पोलिसांकडे येणार अद्यावत कॅमेरे, वाहतूक नियम तोडणाऱ्यावर राहणार बारीक लक्ष, पुण्यात आता फोटोवरून कारवाई

pcnews24

Leave a Comment