February 24, 2024
PC News24
पिंपरी चिंचवड

रहाटणी:छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पावित्र्य धोक्यात.

रहाटणी:छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पावित्र्य धोक्यात.

रहाटणी, ता. १२ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये पालिका शाळेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य २१ फुटी अश्वारूढ पुतळा उभारून स्मारक विकसित केले आहे.

मात्र, सध्या या स्मारक परिसरात दारूच्या बाटल्या, तंबाखूजन्य पदार्थ पान खाऊन थुंकणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इथली सुरक्षा रामभरोसे झाली असून स्मारकाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने येथे सीसीटीव्ही बसवून सुरक्षा रक्षक नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेच्या वतीने येथील या पुतळ्याचे लोकार्पण १२ मार्च २०२२ रोजी झाले. मात्र, तेव्हापासून स्मारकाची सुरक्षा व पावित्र्य टिकवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्मारकाच्या आवारामध्ये काही समाज कंटकांकडून मद्यपान करून दारूच्या बाटल्या, गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणे, सिगारेटचे पाकिटे तसेच कचरा स्मारकाजवळच सोडून जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नसल्याने समाजकंटकांचा दिवसेंदिवस सुळसुळाट वाढत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.‘‘भविष्यामध्ये या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कोणत्याही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. स्मारकाचे पावित्र्य टिकून राहावे, यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत. तसेच सुरक्षा रक्षकाची नेमणूकही तातडीने करणे गरजेचे आहे.’’ अशी मागणी नागरिक विशाल नखाते यांनी केली.

‘‘स्मारकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात आयुक्तांकडे प्रस्ताव देणार आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकाबाबत मागणी होणे गरजेचे आहे.’’ असे महापालिका मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी सांगितले

Related posts

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त- महानगर पालिकेची दिरंगाई?

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

pcnews24

अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.

pcnews24

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन,संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन.

pcnews24

महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांसाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन…

pcnews24

औद्योगिक सांडपाण्याबाबतची माहिती जमा करण्याचे आयुक्तांचे आवाहन

pcnews24

Leave a Comment