February 24, 2024
PC News24
सामाजिक

चला जाणून घेऊया आपल्या शहराचा समृद्ध सांस्कृतिक,ऐतिहासिक वारसा! १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ‘पिंपरी-चिंचवड हेरिटेज वॉक’आयोजन.

चला जाणून घेऊया आपल्या शहराचा समृद्ध सांस्कृतिक,ऐतिहासिक वारसा! १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ‘पिंपरी-चिंचवड हेरिटेज वॉक’आयोजन.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअरच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहराचा समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी‘पिंपरी-चिंचवड हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहराच्या इतिहासाशी जोडण्याची एक अनोखी संधी नागरिक आणि पर्यटकांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, एलप्रो इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कुमार आणि एल्प्रो सिटी स्क्वेअरचे निशांत कंसल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

हेरिटेज वॉकचा उद्घाटन समारंभ भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनीटांनी चिंचवडगांव येथील एलप्रो मॉल येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास स्थानिक प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसह विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.

या हेरिटेज वॉकमध्ये शहरातील 8 अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. ज्यांचे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशात मोलाचे योगदान आहे. या ठिकाणांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शकांचीही निवड करण्यात आली असून प्रत्येक ठिकाणाची सविस्तर माहिती सहभागींना देण्यात येणार आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉकचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. हा उपक्रम शहरातील नागरिकांना शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांशी जोडण्याचा एक दुवा असून रहिवासी आणि अभ्यासकांना शहराच्या इतिहासातील समृद्ध वारसा अनुभवताना पाहण्यासाठी महापालिका उत्सुक आहे.

पिंपरी-चिंचवड हेरिटेज वॉकमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तू तसेच गेल्या काही वर्षांमध्ये समाजाला दिशा देणार्‍या कथांचाही समावेश असणार आहे.

या कार्यक्रमात पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या रविवारी शहरातील विविध ठिकाणांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती देण्यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन केले जाणार आहे.

यावेळी चिंचवड येथील चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी मंदिर, शिरगाव येथील प्रति शिर्डी, देहू येथील संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, देहू गाथा मंदिर, आळंदी येथील श्री गजानन महाराज मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर अशी ठिकाणे निवडण्यात आलेली असून पुढील कार्यक्रमात इतर विविध स्थळांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.

Related posts

महानगरपालिका करण्यास उशीर केल्यास चाकण शहर होईल बकाल – राजेश अग्रवाल

pcnews24

पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.

pcnews24

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘विना वाहन वापर’ धोरणास देशात प्रथम क्रमांक.

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी यांच्यातर्फे सावरकर जयंती रक्तदान करून साजरी

pcnews24

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवप्रेमी देणार शनिवारी मानवंदना,शिवजयंती समन्वय समिती आणि ढोल ताशा महासंघाने केले आयोजन.

pcnews24

‘द केरळ स्टोरी’

pcnews24

Leave a Comment