February 24, 2024
PC News24
धर्म

आळंदी:कमला एकादशी आणि अधिक मासानिमित्त आळंदीत लाखो भाविकांची गर्दी.

आळंदी:कमला एकादशी आणि अधिक मासानिमित्त आळंदीत लाखो भाविकांची गर्दी.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनाकरिता आळंदीतील माऊलीं मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कमला एकादशी व अधिक मासानिमित्त माऊलींच्या दर्शनासाठी एक लाखाच्या वर भाविकांनी गर्दी केली होती.

माऊलींच्या दर्शनासाठी पान दरवाजाच्या येथून दर्शन रांगेतून भाविकांना प्रवेश देण्यात येत होता. महाद्वारातून भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. गणेश दरवाजा,

हनुमान दरवाजा यावेळी बंद ठेवण्यात आला.याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

एकादशी निमित्त माऊलींच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.भाविकांना उपवासाच्या खिचडीचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.तसेच इंद्रायणी घाटावर सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. अधिक मासानिमित्त पवित्र इंद्रायणी नदीत भाविकांनी स्नान व पूजन केले.

Related posts

पुणे:’मशिदीच्या अतिक्रमणावर पुढील ४८ तासांत कारवाई करा’..आमदार महेश लांडगे यांची मागणी,कसबा पेठ पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिद हटविण्यासाठी आंदोलन

pcnews24

रायगडावर पोलिसांचा लाठीचार्ज

pcnews24

नागपूर मधील श्री.गोपाल कृष्ण मंदिरासाठी वस्त्रसंहिता लागू

pcnews24

मनोज जरांगे यांचे उपोषण मागे;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण मागे घेतले.

pcnews24

अश्लिल रॅप साँगप्रकरणी शुभम जाधव या रॅपरवर गुन्हा दाखल.

pcnews24

शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार

pcnews24

Leave a Comment