November 29, 2023
PC News24
ठळक बातम्या

भोसरी एमआयडीसी मध्ये विनापरवाना झाडे तोडली; कंपनी मालक व ठेकेदारावर गुन्हा.

भोसरी एमआयडीसी मध्ये विनापरवाना झाडे तोडली; कंपनी मालक व ठेकेदारावर गुन्हा.

भोसरी एमआयडीसी FII ब्लॉक मधील कंपनीमध्ये विनापरवाना झाडे तोडल्यामुळे कंपनी, मालकसह ठेकेदाराविरोधात महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.16) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.कंपनी मालक सुरेश जे बजाज आणि ठेकेदार राजेंद्र बाबू मांजरे यांच्याविरोधात झाडांचे संरक्षण व जतन या अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी एमआयडीसीत विनापरवाना झाडे तोडली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले. त्यावेळी कंपनीतील आणि फुटपाथवरील महापालिका मालकीची मोहोगणीची चार, कांचन, कोशिया, रेन्ट्री आणि आंब्याचे प्रत्येकी एक झाड जमिनीपासून तोडले होते.लाकडे टेम्पोमध्ये भरून घेवून जात असताना महापालिका अधिकाऱ्यांनी टेम्पोला वाहतूक करण्यास मनाई केली. झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचे समोर आले. याप्रकरणी महापालिकेचे उद्यान सहाय्यक सुहास एकनाथ सामसे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे झाडे तोडली जात आहेत,एक झाडे तोडण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडली जात आहेत. झाडे तोडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.

Related posts

पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले.

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

pcnews24

महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ.मनोज सैनिक.

pcnews24

बनावट चावी द्वारे वाहनांची चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

pcnews24

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लढाऊ विमानात उड्डाण!!!

pcnews24

Leave a Comment