मनोज जरांगे यांचा तपासणी अहवाल पाहून चिंता वाढली.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याचे समोर येत आहे. तपासणी अहवालात जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचे समोर आले आहे. जरांगे यांच्या शरीराची ऑक्सिजन लेव्हल 97 इतकी आहे. त्यांचा बीपी 110 ते 70 दरम्यान आहे. तर पल्स रेट 88 इतका असून रँडम शुगर 112 वर असल्याची माहिती तपासणी अहवालातून समोर आली आहे. अहवाल पाहून डॉक्टरही चिंतेत पडले आहेत.
