ऐतिहासिक निर्णय! औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर-उस्मानाबादचे नामकरण धाराशिव,शिंदे-फडणवीस-अजितपवारांच्या उपस्थितीत जिल्ह्यांचे नामांतर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने छत्रपती संभाजीनगर आणि धारशिव करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले.
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धारशिव करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज घेतला आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचे सूतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.छत्रपती संभाजीनगर व धाराशिव विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव अशी नामकरणाची अंतिम अधिसूचना महसूल विभागामार्फत काढून ती महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
“औरंगाबाद” विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव याचे नामकरण “छत्रपती संभाजीनगर” विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव असे करण्याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच “उस्मानाबाद” जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव याचे नामकरण “धाराशिव” जिल्हा, उप-विभाग, तालुका व गाव असे करण्याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
अशी आहेत नवीन नावं–
औरंगाबाद विभाग – छत्रपती संभाजीनगर विभाग
औरंगाबाद जिल्हा – छत्रपती संभाजीनगर जिल्हा
औरंगाबाद उप-विभाग – छत्रपती संभाजीनगर उप-विभाग
औरंगाबाद तालुका – छत्रपती संभाजीनगर तालुका
औरंगाबाद गाव – छत्रपती संभाजीनगर गाव
उस्मानाबाद जिल्हा – धाराशिव जिल्हा
उस्मानाबाद उप-विभाग – धाराशिव उप-विभाग
उस्मानाबाद तालुका – धाराशिव तालुका
उस्मानाबाद गाव – धाराशिव गाव