November 29, 2023
PC News24
जिल्हामनोरंजनवाहतूक

PMPLच्या मार्गात गणेशोत्सवात तात्पुरते बदल..हे असतील पर्यायी मार्ग

PMPLच्या मार्गात गणेशोत्सवात तात्पुरते बदल..हे असतील पर्यायी मार्ग

पुण्यातील महत्वाचे आणि मध्यवर्ती भागात असलेले गणेशोत्सव मंडळांचे गणपती पहायला येणारे भाविक यांच्यामुळे पुढील दहा दिवस गर्दीचे आहेत. याचा विचार करून पीएमपीएमएल बसने देखील या काळात गर्दीनुसार मार्गात काही बदल केले आहेत. पुणे वाहतूक पोलीसांकडून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस व अन्य वाहतुकीसाठी सायंकाळी सर्व साधारणपणे पाच वाजताच्या सुमारास बंद केले जातात.

परिवहन महामंडळाकडून स्थानक निहाय पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे मार्ग क्रमांक मार्गात बदल करावयाचा तपशिल

1) 2, 2अ,11, 11अ, 11 क, 216, 298, 354, मेट्रो 12, 13,20, 21, 37,38, 88, 297, 28, 30, 10

या मार्गाच्या बसेस गणेशोत्सव काळामध्ये शिवाजी रस्त्याने येण्यास प्रतिबंध केल्यानंतर जगंली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पुलमार्गे टिळक रोडने स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.

टिळक रोड वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गाच्या बसेस शास्त्री रोडने दांडेकर पुल येथे येऊन पुढे मित्र मंडळ चौक मार्गे लक्ष्मी नारायण चौकात येऊन नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.मात्र स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रोडवरील वाहतुकीस प्रतिबंध होईपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

2) 3, 6 हे बसमार्ग रस्ते बंदच्या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत.

3) 55 या मार्गाच्या बसेस रस्ता बंद काळात शनिपार/मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सोडण्यात येतील. तसेच या बसेस जाता-येता नेहमीच्या मार्गाने म्हणजेच अंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलीस चौकी मार्गे सुरू राहतील.

4) 58,59 या बसमार्गाच्या बसेस रस्ता बंद काळात डेक्कन जिमखाना स्थानकावरून सोडण्यात येतील.

5) 8,81,94,108,143,144,144क,144अ, 283 या मार्गाच्या बसेस कोथरूड हुन पुणे स्टेशनकडे जातांना मार्गामध्ये कोणताही बदल होणार नाही.

परंतु पुणे स्टेशन कडून येताना या मार्गांच्या बसेस ससून हॉस्पिटल, मालधक्का, जुना बाजार,म.न.पा. भवन बस स्थानक, काँग्रेस भवन, बालगंधर्व, डेक्कन बस स्थानक, खंडुजी बाबा चौक येथून पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. हा बदल वाहतूक पोलीसांनी लक्ष्मी रोड वाहतुकीस बंद केल्यानंतर करावयाचे आहे.

6) 9, 174 मार्ग क्र. 174 या मार्गाच्या बसेस कोंढवा गेट येथुन पुणे स्टेशनकडे येताना केळकर रोडनेअ.ब.चौक येथे येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने लाल महाल येथे येऊन पुढे देवजी बाबा मंदिर चौक येथुन उजव्या हाताला वळण घेऊन गुरूद्वारा रस्ता मार्गे हमजे खान चौक येथे येऊन डाव्याहाताला वळण घेऊन पुढे नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.

तर मार्ग क्र. 174 पुणे स्टेशन कडून एनडीए कोंढवा गेट कडे जाताना जर लक्ष्मी रोड वाहतुकीकरीता बंद केल्यास या मार्गाच्या बसेस नेहमीच्या मार्गाने मॉडर्न बेकरी चौक येथे येऊन डाव्या बाजूस वळण घेऊन सेव्हन लव्हज चौकातुन उजव्या हाताला वळण घेऊन स्वारगेट चौकात येतील. स्वारगेट चौकातून सरळ नेहरू स्टेडीयमवरून सारसबाग टिळक रोडमार्गे डेक्कन कॉर्नर येथे जातील व तेथुन पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.

7) 7,197,202 या मार्गांवरील बसेस रस्ता बंद काळात जाता-येता म्हात्रेपूल मार्गे स्वारगेट शंकरशेठ रोड सेव्हन लव्हज चौकातून डावीकडे वळुन रामोशी गेट, भवानी माता मंदिर, म.गांधी स्थानकापुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र भवानीमाता मंदिराजवळ रस्ता बंद झाल्यानंतर गोळीबार मैदान, म.गांधी स्थानकापुढे जाता-येता नेहमीच्या मार्गाने सुरू राहतील.

8)12, 42, 299 या मार्गांवरील बसेस शास्त्री रोड बंद झाल्यावर दांडेकर पूल नंतर सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रेपूल वरून पुढे कर्वेरोड डेक्कन व पुढे नेहमीच्या मार्गाने जाता-येता चालू राहतील.

9) 5,24,24अ,235 ,236 या बस मार्गावर बसेस जाता-येता नेहमी प्रमाणे संचलनात राहतील.

10) 180,181 वाहतूक पोलीसांनी नेहमीचा रस्ता बंद केल्यानंतर या मार्गांवरील बसेस मंगला टॉकिज नंतर, सुर्या हॉस्पिटल, कुभांरवाडा, जुना बाजार, बोल्हाई चौक, लाल देऊळ, वेस्टएंड, जुना पुलगेट, म.गांधी स्टॅन्ड व पुढे नेहमीच्या मार्गाने जाता-येता संचलनात राहतील.

11)4,26,68,71,339,232,103,89,90,64,72,78,199,गणेशोत्सव कालावधीमध्ये टिळकरोड वाहतूकी करिता बंद झाल्यानंतर हे मार्ग शास्त्रीरोड, दांडेकर पूल मार्गे संचलनात राहतील.

12) 113,113अ – गणेशोत्सव कालावधीमध्ये सदरचे मार्ग दोन्ही पाळीमध्ये मनपा पंप स्थानकावरून संचलनात राहतील.गणेशोत्सव काळात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बसमार्गांमध्ये वरीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. तथापि ऐनवेळी वाहतुक पोलीस विभागाकडून वाहतुकीमध्ये बदल केल्यास त्याप्रमाणे बस संचलन सुरू राहील.

Related posts

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

पुणे महापालिकेचा BRT मार्ग हटवण्याचा निर्णय

pcnews24

वंदे भारतसह एक्स्प्रेस ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह चेअर आणि एसी चेअरच्या तिकीट दरात २५ टक्क्यांपर्यंत कपात

pcnews24

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा,तर मोरया गोसावी देवस्थानासाठी निधी.

pcnews24

पुणे विभागातील ‘अमृत भारत’ योजनेत समावेश झालेल्या तीन रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास; पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन.

pcnews24

ओडिशात 3 गाड्या रुळावरून घसरल्याने 50 पेक्षा जादा ठार, 350 पेक्षा जास्त जखमी

pcnews24

Leave a Comment