March 1, 2024
PC News24
गुन्हाजिल्हाजीवनशैली

संपत्तीच्या वादावरुन जादूटोणा,अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस,सहा जणांवर गुन्हा दाखल.

संपत्तीच्या वादावरुन जादूटोणा,अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस,सहा जणांवर गुन्हा दाखल.

पुण्यात कोथरूड येथे एकाने एका महिलेची साडी चोरून एका मांत्रिकाकडे नेऊन लिंबू, टाचण्या टोचून अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार संपत्तीच्या वादावरुन झाल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व आघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याच्या व त्याचा समूळ उच्चाटन करण्यात अधिनियम कलमानुसार सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी तक्रार दिली आहे. आजी कांता सुरेश चव्हाण, मामा गिरीश सुरेश चव्हाण, सावत्र आई संगीता सुपेकर, सावत्र भाऊ स्वप्निल सुपेकर, चुलत बहीण सोनल सुपेकर व देवऋषी स्वप्निल भोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी यांच्या आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगनमत करून कट रचून प्रॉपर्टीच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांच्या वस्तीतील मुलगा कृष्णा चांदणे याने त्याचे पत्नीच्या कारणावरून फिर्यादीचे मामा यांना मारले. याचा राग मनात धरून महिलेच्या आईची साडी चोरली होती.त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईची साडी तसेच फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकु आशा सुपेकर व कृष्णा चांदणे याचे फोटो ठेवुन फोटोचे व साडीचे बाजुला अंडी, टाचणे लावलेले लिंबू, भात कसले तरी काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणी करता जादू टोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Related posts

दहा लाखांसाठी वडिलांनीच केले स्वतःच्या आणि मेव्हणीच्या मुलींचे अपहरण.

pcnews24

बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ… आरोपीला अटक.

pcnews24

शरद पवार यांच्या वक्तव्याने आघाडीत संभ्रम.

pcnews24

वाहन चालकाकडून पैसे घेतल्याने 2 पोलीस निलंबित (व्हिडिओ सह)

pcnews24

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची किशोर आवारे यांच्या पत्नीची मागणी.

pcnews24

शून्य कचरा संकल्पना स्पर्धेत महिंद्रा रॉयल हाउसिंग सोसायटीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

pcnews24

Leave a Comment